दररोज ४९ कोटींची उलाढाल होणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचं काम योगीच्या इशाऱ्यावर कसं चालायचं?
एबीजी शिपयार्ड बँक फसवणूक प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच देशात आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं. हे प्रकरण आहे भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईशी (राष्ट्रीय शेअर बाजार) संबंधित. दररोज ४९ कोटींचा व्यवहार होणाऱ्या आणि दिवसाचा टर्नओव्हर ६४ हजार कोटी असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचं काम एका अज्ञात हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर सुरू होतं, तेही तब्बल २० […]
ADVERTISEMENT
एबीजी शिपयार्ड बँक फसवणूक प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच देशात आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं. हे प्रकरण आहे भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईशी (राष्ट्रीय शेअर बाजार) संबंधित. दररोज ४९ कोटींचा व्यवहार होणाऱ्या आणि दिवसाचा टर्नओव्हर ६४ हजार कोटी असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचं काम एका अज्ञात हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर सुरू होतं, तेही तब्बल २० वर्ष. सेबीने केलेल्या तपासातून हे प्रकरण समोर आलं आर्थिक जगतासह सगळ्यानांच धक्का बसला.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण या एका हिमालयातील योगीशी चर्चा करून आणि दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घेत होत्या. हे प्रकरण सेबीकडून समोर आल्यानंतर हिमालयातील बाबा नेमकं राष्ट्रीय शेअर बाजाराचा कारभार कसा चालवत होता, असा प्रश्नही समोर आला. या प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतर समोर आली चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवणारी गोष्ट!
चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील योगीच्या मनाप्रमाणे काम करताना आनंद सुब्रमण्यम या व्यक्तीला नोकरी देण्यासाठी पद निर्माण करण्यात आलं. वार्षिक वेतन १५ लाख रुपये असणाऱ्या सुब्रमण्यम यांना १.३८ कोटी वार्षिक वेतन दिलं गेलं. आनंद सुब्रमण्यमकडे त्या पदासाठीच्या पात्रता नसतानाही इतकं मोठं वार्षिक वेतन दिलं गेलं.
हे वाचलं का?
सुब्रमण्यम एनएसईमध्ये रूजू झाल्यानंतर त्यांना प्रत्येक वर्षी भरघोस वेतन वाढ दिली गेली. तीन वर्षाच्या काळातच या व्यक्तीला ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर बनवलं गेलं. फक्त तीन दिवसच ऑफिसला येऊन सुब्रमण्यम एनएसई संदर्भातील निर्णय घ्यायचा. हे सगळं घडतं होतं हिमालयातील योगीच्या सांगण्यावरून. या प्रकारातील कळस म्हणजे या योगीला चित्रा रामकृष्ण यांनी कधीही बघितलेलं नाही. त्याला कुणाही भेटलेलं नाही.
हे सगळं प्रकरण तीन व्यक्तींभोवतीच आहे. पहिली व्यक्ती आहेत एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण. दुसरा व्यक्ती आनंद सुब्रमण्यम, जो मनमर्जीनुसार काम करायचा. तिसरी व्यक्ती आहे अदृश्य हिमालयातील योगी. हा योगी हिमालयात वास्तव्याला असल्याचं सांगितलं जात आणि चित्रा रामकृष्ण त्याला शिरोमणी म्हणतात. चित्रा रामकृष्ण २०१३ ते २०१६ या काळात एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळातील एनएसई संदर्भातील सगळे निर्णय त्यांनी हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार घेतले.
ADVERTISEMENT
हे प्रकरण इतकं गुंतागुतीचं आहे की, याच्या तळाशी जाण्यासाठी सेबीला तब्बल ६ वर्ष लागली. प्रदीर्घ तपासानंतर सेबीने मागील आठवड्यात १९० पानांचा आदेश काढला. एनएसईमध्ये चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू असल्याचं आणि चुकीची काम होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटींचा, तर आनंद सुब्रमण्यम यांना २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ADVERTISEMENT
सुब्रमण्यमच अज्ञात योगी?
या प्रकरणातील अज्ञात हिमालयीन योगी हा आनंद सुब्रमण्यमच असल्याचं काही जण बोलत आहेत. सुब्रमण्यमच स्वतःच्या मर्जीप्रमाणे चित्रा रामकृष्ण यांना आदेश देत होता. एनएनईनेही सेबीकडे सोपवलेल्या जबाबात ही शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, सेबीकडून हा तर्क अयोग्य ठरवण्यात आला आहे.
आनंद सुब्रमण्यमला अज्ञात योगी मानण्यास सेबीने नकार दिला असला, तरी एनएसईकडून करण्यात आलेल्या दाव्यात तथ्य असल्याचं दिसत आहे. एनएसईने सेबीला २०१८ मध्ये पत्र पाठवलं होतं. ज्यात म्हटलं होतं की, एनएनसईच्या विधि सल्लागारांनी मनोविश्लेषकांची मदत घेतली होती. त्यानंतर आनंद सुब्रमण्यमनेच अज्ञात योगी ही ओळख निर्माण केली होती. त्या माध्यमातूनच तो चित्रा रामकृष्ण यांना आदेश देत होता.
महत्त्वाचं म्हणजे आनंद सुब्रमण्यम २२ वर्षांपासून योगीला ओळखत आहे. योगीनेच आनंद सुब्रमण्यमला नोकरी देण्यास सांगितलं होतं. योगीच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यमला भरघोस पगारवाढ दिली गेली. महत्त्वाचं म्हणजे योगीच्या एका मेलमध्ये असं म्हटलेलं आहे की, जन्म घ्यायचा झाला तर आनंद सुब्रमण्यमचं शरीर सगळ्यात चांगलं आहे.
ईमेलवरून दिली जात होती माहिती
चित्रा रामकृष्णन यांनी योगीच्याबद्दल सेबीला माहिती दिली. ते शरीर रुपाने अस्तित्वात नाही, पण ते कोणतंही रुप धारण करू शकतात. ते हिमालयात असतात. चित्रा रामकृष्ण ईमेलवरून या योगीशी चर्चा करायची. त्याला माहिती द्यायची. एनएसईसंदर्भातील संवेदनशील, गोपनीय माहिती त्या ईमेलवरून योगीला पाठवायच्या. चित्रा रामकृष्ण यांनी योगीला पाठवलेल्या माहिती एनएसईचं पुढील पाच वर्षाच्या काळातील फायनान्शिअल प्रोजेक्शनपासून ते कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यमापनापर्यंतची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT