भाजप आमदार नितेश राणेंच्या जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं वैर असो किंवा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वैर असो ते किती टोकाचं आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. अशात आज कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 28 ते 30 मार्च […]
ADVERTISEMENT
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं वैर असो किंवा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वैर असो ते किती टोकाचं आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. अशात आज कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
28 ते 30 मार्च या कालावधीत आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज सकाळी आदित्य ठाकरे चिपी येथील विमानतळावर उतरतील त्यानंतर मालवण जेट्टी या ठिकाणी जाऊन पाहणी करतील. कुणकेश्वर येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतील. देवगड या नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी जो विजय मिळवला त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित कर्यात आला आहे.
राणेंच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतील. विधानभवनातलं म्यॅाव म्यॅाव प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण, विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलं का?
आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा
28 मार्च
ADVERTISEMENT
सकाळी 10 वाजता : खासगी विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण
ADVERTISEMENT
सकाळी 10.30 वाजता : चिपी विमानतळावर आगमन, तिथून मालवणकडे प्रयाण
सकाळी 11 वाजता : जेट्टी बंधारा पाहणी, फिश अॅक्वेरियमचे सादरीकरण कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11.30 वाजता : कुणकेश्वरकडे प्रयाण
दुपारी 12.15 वाजता : श्री देव कुणकेश्वर दर्शन
दुपारी 12.25 वाजता : श्री देव कुणकेश्वर मंदिर इथल्या विविध विकासकामांच्या लोकार्पणास उपस्थिती
दुपारी 1 वाजता : नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 2.30 वाजता : राखीव
दुपारी 3 वाजता : वायंगणी, वेंगुर्लाकडे प्रयाण
दुपारी 4.30 वाजता : कासव जत्रा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
संध्याकाळी 5 वाजता : सागरतीर्थ, वेंगुर्लाकडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : फोमेंटो ग्रुप व पाहणी
संध्याकाळी 6 वाजता : वेंगुर्लाकडे प्रयाण
संध्याकाळी 6.15 वाजता : विकासकामांचे भूमिपूजन, विविध प्रकल्पांची पाहणी
रात्री 7.15 वाजता : सिंधुरत्न समृद्ध योजना लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
रात्री 8.15 वाजता : कुडाळकडे प्रयाण
रात्री 9.30 वाजता : शिमगोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती
रात्री 10.30 वाजता : मुक्काम
दिवस दुसरा : 29 मार्च
सकाळी 9 वाजता : लांजा, रत्नागिरीकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : पाली, रत्नागिरीकडे रवाना
दुपारी 12 वाजता : पाली, राखीव
दुपारी 1.30 वाजता : गणपतीपुळेकडे प्रयाण
दुपारी 2.15 वाजता : श्रींचे दर्शन
दुपारी 2.30 वाजता : भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 3.30 वाजता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बोट क्लबची पाहणी
दुपारी 3.45 वाजता : जयगड जेट्टीकडे प्रयाण
दुपारी 4.10 वाजता : जयगड जेट्टी इथे आगमन, फेरी बोटीने तवसाळकडे प्रयाण
दुपारी 4.40 वाजता : गुहाकरडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : वेळणेश्वर इथे भूमिपूजन आणि मेळाव्याला उपस्थिती
रात्री : गुहागरमध्ये मुक्काम
दिवस तिसरा : 30 मार्च
सकाळी 8.15 वाजता : सावर्डेकडे प्रयाण
सकाळी 9.05 वाजता : चित्रकला महाविद्यालयाला भेट आणि स्वर्गीय निकम यांच्या समाधीस्थळाला भेट
सकाळी 9.20 वाजता : पेठमाप, चिपळूणकडे प्रयाण
सकाळी 9.30 वाजता : उपक्रमाची पाहणी, लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
सकाळी 10 वाजता : दापोलीकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : महाड, रायगडकडे प्रयाण
दुपारी 2 वाजता : महाडमध्ये आगमन
दुपारी 2.40 वाजता : लोणेरे, माणगावकडे प्रयाण
दुपारी 3 वाजता : भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 4.15 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
संध्याकाळी 5.30 : मुंबईकडे प्रयाण
रात्री 8.30 वाजता : मुंबईत आगमन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT