भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंवर तुळजापुरात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह इतरांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कोरोना नियमांचे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम 109,188 व 269 अनव्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामान्य भक्तांच्या आधी अनधिकृतपणे तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊन विनामास्क फोटोसेशन करणे भोसले यांना भोवले आहे.

पास न काढताच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी काल सहपरिवार घेतले तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. दुपारी 12 नंतर घटस्थापनानंतर भाविक यांना मंदिरात सांयकाळी 6 नंतर प्रवेश असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश काढले होते मात्र त्यापूर्वीच भोसले यांनी प्रवेश करून दर्शन घेतले.तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात भोसले यांनी विनामास्क फोटो सेशन केले हे त्यांना चांगलेच अंगलट आले आहे.

तुळजाभवानीसह राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी भोसले यांनी तुळजाभवानी मंदिर समोर आध्यत्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन केले होते. मंदिर खुले झाल्यानंतर तुळजाभवानी दर्शन घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याची घोषणा भोसले यांनी केली होती मात्र दुपारी 12 वाजता घटस्थापनानंतर सांयकाळी 6 वाजता भाविकांना दर्शन देण्याचे आदेश होते दर्शनासाठी 15000 भाविकांची मर्यादा होती त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफ लाइन पास काढणे गरजेचे होते. मात्र भोसले यांनी नियम न पाळता सामान्य भक्तांच्या आधी प्रवेश करून दर्शन घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भोसले यांच्या या कृत्याबद्दल प्रसार माध्यमातून मंदिर संस्थानच्या कार्यपद्धतीवर टीका झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांना तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मंदिराचे सहायक व्यवस्थापक प्रवीण अमृतराव यांच्या तक्रारीवरून भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, याचा तपास पोलिस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार राठोड हे करीत आहेत.

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी घटस्थापनेच्या मुहुर्तावर सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जुलमी ठाकरे सरकारचे देवीने मर्दन करावे व महाराष्ट्रमध्ये राम राज्याची स्थापना करावी असे साकडे त्यांनी घातले. अधर्मी ठाकरे सरकारने गेल्या 6 महिन्यांपासून देवी देवतांना कुलूपबंद केले होते, त्यांची आता सुटका झाली आहे. घटस्थापना हा आनंदच दिवस आहे , लाखो लोकांची चूल पेटणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले सावट कमी होऊ दे शेतकरीला बळ दे असे साकडे तुषार भोसले यांनी देवीसमोर घातले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT