ICICI बँकेच्या माजी CEO Chanda Kochhar आणि पतीला CBI कडून अटक

मुंबई तक

CBI has arrested former ceo icici bank chanda kochhar : नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कर्ज फसवणूक प्रकरणी सीबीआयने् (CBI) चंदा कोचर*(Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. गेली अनेक वर्ष कर्ज फसवणूक प्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरु होती. अखेर आज (23 डिसेंबर) सीबीआयने त्यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

CBI has arrested former ceo icici bank chanda kochhar : नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कर्ज फसवणूक प्रकरणी सीबीआयने् (CBI) चंदा कोचर*(Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. गेली अनेक वर्ष कर्ज फसवणूक प्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरु होती. अखेर आज (23 डिसेंबर) सीबीआयने त्यांना अटक करुन मोठा दणका दिला आहे. (cbi has arrested former ceo icici bank chanda kochhar and her husband deepak kochhar)

मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांच्यावर तिच्या पतीला आर्थिक लाभ देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICICI बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडीओकॉन समूहाने या कर्जातील 86 टक्के (सुमारे 2810 कोटी रुपये) परतफेड केलीच नाही. त्यामुळे 2017 मध्ये हे कर्ज NPA (Non Performing Assets) मध्ये टाकण्यात आले.

आधार नंबरवरून तुमचा बँक अकाउंट हॅक होऊ शकतो का? सेफ्टीसाठी करा हे काम

चंदा कोचर यांनी 1984 मध्ये ICICI बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला होता. 1994 मध्ये जेव्हा ICICI संपूर्ण मालकीची बँकिंग कंपनी बनली तेव्हा चंदा कोचर यांना सहाय्यक महाव्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. यानंतर चंदा कोचर याच बँकेत यशाच्या एक-एक पायऱ्या चढत राहिल्या. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदांद्वारे बँकेने त्यांना 2001 मध्ये थेट कार्यकारी संचालक बनवले. यानंतर त्यांच्याकडे कॉर्पोरेट व्यवसाय पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर तिला मुख्य आर्थिक अधिकारी बनवण्यात आले.

हे वाचलं का?