माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी CBIचा छापा
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या 100 कोटीच्या लेटर बॉम्ब प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने अनिल अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवलाय. त्याचप्रमाणे सीबीआयकडून अनेक ठिकाणी शोध घेण्यात येतोय. मुंबईचे माजी सीपी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या […]
ADVERTISEMENT

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या 100 कोटीच्या लेटर बॉम्ब प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने अनिल अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवलाय. त्याचप्रमाणे सीबीआयकडून अनेक ठिकाणी शोध घेण्यात येतोय. मुंबईचे माजी सीपी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी निलंबित करण्यात आलं होतं. या प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
मोठी बातमी ! परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालय तसंच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला.










