Lalu Prasad Yadav यांच्या अडचणी वाढवणार ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळा काय?
CBI News : पाटणा : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri devi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सीबीआयने धडक दिली. यावेळी सीबीआयने राबडी देवी यांची ४ तास कसून चौकशी केली. ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती यांना 15 मार्च रोजी कोर्टात हजर […]
ADVERTISEMENT

CBI News : पाटणा : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri devi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सीबीआयने धडक दिली. यावेळी सीबीआयने राबडी देवी यांची ४ तास कसून चौकशी केली. ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती यांना 15 मार्च रोजी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. हा घोटाळा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाचा आहे. (CBI has reached the house of Rabri Devi, wife of former Bihar Chief Minister Lalu Yadav. CBI is probing the land for job scam.)
लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 यादरम्यान रेल्वेमंत्री होते. या प्रकरणी गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर रोजी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 16 जणांना आरोपी करण्यात आले होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये सीबीआयने लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांचे ओएसडी असलेले भोला यादव यांना अटक केली होती.
काय आहे प्रकरण?
आयआरसीटीसी घोटाळा हा लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांकडून त्यांना रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्याचा दावा केला जात आहे. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते. याप्रकरणी सीबीआयने 18 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना प्रथम रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांवर भरती करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना नियमित करण्यात आलं. सीबीआयचे म्हणणं आहे की लालू यादव यांच्या कुटुंबाने पाटण्यात 1.05 लाख चौरस फूट जमिनीवर कथित अतिक्रमण केलं आहे. या जमिनींचा व्यवहार रोखीने झाला. म्हणजेच लालू यादव यांनी कुटुंबाने रोख पैसे देऊन या जमिनी विकत घेतल्या होत्या. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या जमिनी अत्यंत कमी किमतीत विकल्या गेल्या.