चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘…तर तो पुरस्कार संजय राऊतांना देईन’
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या कलगीतुरा रंगताना दिसत आहे. संजय राऊतांनी सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी राऊतांचा गौरव करण्याची इच्छा बोलून दाखवत चिमटा काढला आहे. सामनामध्ये चंद्रकांत पाटील यांचा लेख प्रसिद्ध […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या कलगीतुरा रंगताना दिसत आहे. संजय राऊतांनी सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी राऊतांचा गौरव करण्याची इच्छा बोलून दाखवत चिमटा काढला आहे.
सामनामध्ये चंद्रकांत पाटील यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं. राऊतांच्या या विधानाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
‘चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकू, त्यांची तेवढीच…’, राऊतांनी उडवली खिल्ली
मुंबई माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कुणी शंभर कोटी. कुणी दीडशे कोटी. हे सव्वा रुपया. हरकत नाही. फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सूचवेन की थोडी रक्कम वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानी म्हणजे काय, तर माझी मानहानी झालीये आणि ती एव्हढ्या कोटींची आहे. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाहीये. त्यामुळे त्यांनी सव्वा रुपयांच्याऐवजी ही रक्कम थोडी वाढवायला पाहिजे’, अशी कोपरखळी चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावली.