चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख? नव्या वादाला फुटलं तोंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Chandrashekhar Bawankule news)

ADVERTISEMENT

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’ हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरुन सुरु झालेला वाद अद्याप ताजा आहे. अशात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात बावनकुळे औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख करत असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “हे जितेंद्र आव्हाड खोट्या प्रसिद्धीसाठी नौटंकी करत असतात. आव्हाड एक स्टंटबाज आणि नौटंकी माणूस आहे. त्यांच्या प्रत्येक विधानावरुन वाद निर्माण होतो आता औरंगजेबजी यांना ते क्रूर मानत नाहीत” बानवकुळे यांच्या या विधानामुळं वादाचा नवा वाद सुरु झाला आहे.

हे वाचलं का?

मिटकरींकडून व्हिडिओ ट्विट अन् भाजपला सवाल :

बावनकुळे यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत आमदार मिटकरी यांनी भाजपच्या नेत्यांना काही प्रश्न विचारले. मिटकरी म्हणाले, “क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या भूमिकेवरुन राजकारण तापलं :

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भूमिकेवरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असं मतं त्यांनी मांडलं आहे. यावरुनच भाजपने अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. राज्यात ठिकठिकणी आंदोलन करण्यात आली. तसंच काही ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचंही दहन केलं. यावर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT