Anant Gite: भुजबळ आणि राणे यांचं बंड स्वबळावर, एकनाथ शिंदेचं बंड भाजप पुरस्कृत
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ […]
ADVERTISEMENT
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार जरुर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी यावेळी केली.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते मात्र संजय राऊत यांनी खोडा घातला”; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट
शिवसेनेने सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात-अनंत गीते
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील राजकिय वातावरण ढवळून निघालं आहे. बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवायला चालली आहे असा थेट आरोप या आमदारांनी केला होता. त्यातच आता अनंत गीते यांनीही शिवसेनेच्या स्वबळावरचा नारा दिला आहे. याबाबत बोलताना गीते म्हणाले की, महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं, तशी विनंती मी उद्धव साहेबांना करणार आहे. उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही असं गीते यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray: “धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार”
ADVERTISEMENT
अनंत गीते म्हणातात शिवसेना संकटात असताना पाठिशी उभं राहणं ही माझी नैतिक जबाबदारी
दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनंत गीते संघटनेत सक्रिय झाले आहेत. याबाबत बोलताना गीते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली आहे. शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचं गीते यावेळी म्हणाले.
शिवसेना वर्ग करता येणार नाही, निवडणूक आयोग याबाबत योग्य तो निर्णय घेईल असंही गीते म्हणाले.तसेच गद्दार शब्द लागत असेल तर शिवसैनिक आहोत हे का सांगावे लागते, शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नसल्याचं सांगत गीते यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली.
रामदास कदम यांना आव्हान देण्याच्या लायकीचं कुणी बनवलं?
दापोली मंडणगड या विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम यांचे आव्हान नाही का? असा सवाल देखील अनंत गीते यांना पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावेळी त्यांनी रामदास कदम यांना आव्हान देण्याच्या लायकीचे बनवले कुणी? असा सवाल त्यानी केला आणि रामदास कदम यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT