Maharashtra sadan scam : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?; दमानियांची कोर्टात धाव

विद्या

महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्तता करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी (ACB) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरूंगवारी करुन आलेले राष्ट्रवादीचे नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्तता करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी (ACB) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरूंगवारी करुन आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. भुजबळांकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली असून, भुजबळांच्या मागणीला आता एसीबी (Anti-corruption Bureau) व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे.

२००५-०६ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचं काम करण्यासाठी निविदा न काढता मे. के.एस. चमणकर कंपनीला कंत्राट दिले. या कंत्राटाच्या मोबदल्यात संबंधित कंपनीकडून छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात भुजबळांनी निर्दोष मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर एसीबी आणि अंजली दमानिया यांनी विरोध केला.

घोटाळ्यातील आरोपी आणि सहआरोपींनी यातून मुक्तता करण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे. ‘संबंधित व्यक्ती राज्याच्या मंत्रीपदी असताना हा घोटाळा करण्यात आलेला असून, या प्रकरणावर अंतिम निकाल देण्यापूर्वी आम्हाला बाजू मांडण्याची परवानगी द्यावी’, असं दमानियांनी याचिकेत म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp