Viral: लोकसंख्या वाढावी म्हणून दिला जातोय ‘रोमान्स’ ब्रेक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

china birth rate falling college student give Spring Break
china birth rate falling college student give Spring Break
social share
google news

Spring Break in China : चीनमध्ये जन्मदर (China Birth Rate) चांगलाच घटला आहे. या घटत्या जन्मदरामुळे लोकसंख्य़ा देखील कमी झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता चीनने अजबच निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकीत झाले आहे. खरं तर चीनने जन्मदर वाढीसाठी (Spring Break) महाविद्यालयांचा आधार घेतला आहे. कॉलेजमधील तरूण-तरूणींना सुट्टयावर पाठवलं आहे. तसेच लग्न न करताच बाळ जन्माला घालण्याची परवानगी देखील दिली आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे आई बनणाऱ्या महिलेला विवाहित महिलेप्रमाणेच सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे चीनमध्ये जन्मदर वाढीचा कयास बांधला आहे. आता त्यांच्या या निर्णयाची संपूर्ण जगभर चर्चा आहे.(china birth rate falling college student give a week of to fall in love)

ADVERTISEMENT

चीन देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानुसार आता जन्मदर वाढविण्यासाठी चीनने कॉलेजचा आधार घेतला आहे. चीनमधील अनेक महाविद्यालयातील तरूण-तरूणींना त्याच्या प्रेमाचा शोध घेण्याच्या नावाखाली एका आठवड्याची सुट्टी (Spring Break)जाहिर करण्यात आली होती. या सुट्ट्यांमध्ये तरूण-तरूणींना रोमान्सवर भर देण्यास सांगितले गेले होते.

हे ही वाचा : केळं आणि धूर संगटच.. केळं खाऊन तोंडातून धूर काढणारा अवलिया कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, फॅन मेई एज्युकेशन ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या 9 महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने 21 मार्च रोजी पहिल्यांदा स्प्रिंग ब्रेकची (Spring Break) घोषणा केली आहे. यासह उर्वरीत महाविद्यालयांमध्ये 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान सुट्टी जाहिर करण्यात आली होती. या ब्रेकमध्ये रोमान्सवर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले आहे. यासोबतच लग्न न करताही बाळाला जन्म देता येणार आहे. या निर्णयाने जन्मदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे वाचलं का?

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गृहपाठही दिला आहे. यासोबत विद्यार्थ्यांना त्याचे अनुभव एका डायरीत लिहायला सांगितलेत.तसेच वैयक्तिक वाढीचा मागोवा घेणे, प्रवासाचा व्हिडिओ बनवणे अशा गोष्टी सांगितल्या आहेत. सरकारने महाविद्यालयांना केलेल्या या सुचनेनुसार जन्मदर वाढविण्याच्या निर्णय़ापैकी हा एक निर्णय़ असणार आहे.

1980 ते 2015 दरम्यान चीनने चाईल्ड पॉलिसीसह मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर आता लोकसंख्या कमी होत असल्याचे पाहून 2021 साली चीनेने कमीत कमी तीन मुले जन्माला घालण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र तरी देखील गेल्या तीन वर्षात चीनची लोकसंख्या न वाढल्याने चिंता वाढली. तसेच लोकसंख्या वाढीसाठी अनेक निर्णय घ्यावे लागत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : जगातली सर्वांत महागडी नंबरप्लेट! दुसरी आलिशान कार खरेदी कराल ‘इतकी’ रक्कम

दरम्यान चीनमध्ये वृद्धांची संख्या देखील वाढली आहे. यासोबतच युवक आणि कामगार लोकही कमी झाले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढीसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. आता घेतलेल्या या निर्णयाच जन्म दर आणि लोकसंख्या वाढीवर किती परीणामकारक ठरणार आहे? हे पाहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT