Narendra Modi : ''काँग्रेसने 40 वर्ष सैनिकांच्या कुटुंबियांना...'', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi criticize congress karad sabha satara lok sabha election 2024
डोळ्यात धुळ फेक करण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस मास्टर आहे,
social share
google news

Pm Narendra Modi criticize Congress : सकलेन मुलाणी, सातारा : काँग्रेसने 40 वर्ष सैनिकांच्या कुटुंबियांना वन रँक वन पेन्शनपासून वंचित ठेवल. फक्त 500 कोटीचा झुनझुना दाखवला. डोळ्यात धुळ फेक करण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस मास्टर आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. तसेच बाबासाहेबांच  संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतं नव्हतं. आम्ही आर्टीकल  370 हटवून बाबासाहेबांच संविधान लागू केलं. ही गॅरंटीने मोदीने तुम्हाला दिली होती. आणि ती पुर्ण देखील केली, असे मोदी यांनी सांगितले. ॉ (pm narendra modi criticize congress karad sabha satara lok sabha election 2024) 

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत मोदी बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू व्हायचं नाही. कारण काश्मीरमध्ये 370 ची भिंत बनली होती. पण तुमचा सेवक मोदीने आर्टीकल 370 ला उद्ध्वस्त केलं आणि कब्रस्तानमध्ये गाडलं. ही गॅरंटीने मोदीने तुम्हाला दिली होती. आणि ती पुर्ण देखील केली,असे मोदींनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा : पुन्हा 'सूरत पॅटर्न'! काँग्रेसची आणखी एक जागा गेली, उमेदवारानेच केला मोठा 'गेम'

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की,  आरक्षणाच्या नावावर खोटं बोलून देशवासियांना फसवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना टोचणारा मला प्रश्न विचारायचाय. जम्मू काश्मीरमध्ये राहणारे आदिवासी, दलित आरक्षणाचे हकदार होते की नव्हते. जर देशातील आदिवासींना, दलितांना आरक्षण मिळू शकते. तर जम्मू काश्मीरमध्ये आदिवासी, दलितांना आरक्षणापासून वंचित का ठेवलं? संविधान तिकडे का लागू केलं नाहीत? असा सवाल मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. पण आम्ही 370 हटवून बाबासाहेबांच्या संविधानाला जम्मू काश्मीरमध्येही लागू केलं. त्यामुळे दलित, आदिवासी आणि ओबीसींना आरक्षणाचा अधिकार मिळाला, असे मोदी यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : जॉब सोडला.. शेवटच्या दिवशी ऑफिससमोर ढोल लावून नाच नाच नाचला...

कर्नाटकात ओबीसीला जे 27 टक्के आरक्षण मिळालं आहे, हे आरक्षण सर्व मुस्लिमांना देऊन ओबीसी घोषीत करण्यात आलं आणि फतवा केला.ओबीसींच्या आरक्षणावर रातोरात डाका टाकला गेला. आता काँग्रेस संविधान बदलून हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप मोदींनी काँग्रेसवर केला. तसेच काँग्रेस आणि इंडी आघाडीने कान उघडी ठेवून ऐकावे, जिथपर्यंत मोदी जिवंत आहे, धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा तुमचा प्रयत्न, संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न पुर्ण करू देणार नाही, असे मोदींनी यावेळी म्हटले आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT