Satara Lok Sabha Election : शरद पवारांच्या उमेदवारांवरच अटकेची तलवार, प्रकरण काय?

मुंबई तक

Satara Lok Sabha Shashikant Shinde : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

साताराचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि शरद पवार.
सातारातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध नवी मुंबईत गुन्हा दाखल

point

उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध लढवताहेत निवडणूक

Satara Lok Sabha election, Shashikant Shinde : सातारा लोकसभेची यावेळची निवडणूक अटीतटीची आणि संघर्षपूर्ण होणार असं दिसत आहे. कारण ज्यांना शरद पवारांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात मैदानात उतरवलं, त्यांनाच अटक होण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्याविरोधात वाशी येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात एफएसआय घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हाच मुद्दा विरोधकांकडून प्रचारात उचलून धरला जात असून, स्वतः शशिकांत शिंदे आणि शरद पवार या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

मुंबईतील एपीएमसी फळ बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांच्यासह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.  10 कोटींच्या कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात शशिकांत शिंदे यांचेही नाव असून, ते जामिनावर बाहेर आहेत. 

त्यापाठोपाठ एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालिन सचिव सुधीर तृंगार आणि इतर २२ संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शरद पवारांनीही भीती?

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले विरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp