मोठी बातमी! विनायक मेटेंच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबई- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं होतं. अपघातानंतर […]
ADVERTISEMENT

मुंबई- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं होतं.
अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची सीआयडीद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
विनायक मेटेंच्या मृत्यूची एसआयटीकडून चौकशीची करा; राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मागणी
ज्योती मेटे यांनी व्यक्त केली होती शंका
विनायक मेटेंचा मृतदेहं सांगत होता की त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात आणंलं गेलं नाही. मी डॉक्टर असल्यानं माझ्या ते लक्षात आलं. अपघात झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी त्यांना रुग्णालयात आणलं गेल्याचा गंभीर आरोप ज्योती मेटे यांनी केला होता.