लालसिंह चढ्ढा आणि आमिर खानचं कौतुक केल्याने राहुल देशपांडे ट्रोल, स्पष्टीकरण देत म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा लालसिंह चढ्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला म्हणजेच आज रिलिज झाला. या सिनेमाची वाट पाहात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट लालसिंह चढ्ढा हा ट्रेंडही फिरत होता. अनेकांनी या सिनेमावर बहिष्कार घातल्याचं दिसून आलं. अशात या सिनेमाच्या प्रीमियरला गेलेले राहुल देशपांडे यांना ट्रोलिंग सहन करावं लागलं. राहुल देशपांडे यांनी या सिनेमाचं आणि आमिर खानचं कौतुक केल्याने हे ट्रोलिंग झालं. ज्यानंतर राहुल देशपांडे यांना फेसबुकवर पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं.

ADVERTISEMENT

गायक राहुल देशपांडे लालसिंह चढ्ढा सिनेमाबाबत काय म्हणाले होते?

राहुल देशपांडे यांनी आमिर खानसोबतचा एक फोटो ट्विट केला. त्यानंतर लालसिंह चढ्ढा हा सिनेमा आवडला. हा सिनेमा खूप मनापासून निर्मिला आहे. आपल्याला आतून ढवळून काढणारा हा सिनेमा आहे. आमिर खानने या सिनेमात उत्तम काम केलं आहे. तसंच करीना कपूर, मोना सिंह यांचीही कामगिरी उत्तम झाली आहे. आम्हाला प्रीमियरला बोलावल्याबद्दल आभार असं राहुल देशपांडे यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

राहुल देशपांडे यांनी आमिर खानबाबत पोस्ट केल्याचा काय परिणाम झाला?

आमिर खानबाबत ही पोस्ट जेव्हा राहुल देशपांडे यांनी केली तेव्हा त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं. फेसबुक आणि ट्विटरवर राहुल देशपांडे ट्रोल झाले. वसंतराव देशपांडे यांचे नातू आहात म्हणून एक चूक माफ इथपर्यंत प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. यानंतर राहुल देशपांडे यांनी दुसरी पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं.

हे वाचलं का?

राहुल देशपांडे यांनी ट्रोल झाल्यानंतर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

नमस्कार रसिक मित्रहो !!

लालसिंह चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय.

ADVERTISEMENT

त्या प्रीमियरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील आणि पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे किंवा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती ! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा !!

ADVERTISEMENT

अशी पोस्ट करून राहुल देशपांडे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. लालसिंह चढ्ढा हा सिनेमा पाहणं आणि त्याचं कौतुक करणं खास करून आमिर खानचं कौतुक करणं यामुळे राहुल देशपांडे ट्रोल झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT