आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॉर्डिलिया क्रूझचं प्रकरण आणि त्यानंर आर्यन खानवर झालेली कारवाई हे सगळंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणी क्लिन चीट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब ही आहे की ही क्लिन चिट आर्यन खानला दिल्ली एनसीबीनेच दिली आहे. यानंतर आता समीर […]
ADVERTISEMENT
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॉर्डिलिया क्रूझचं प्रकरण आणि त्यानंर आर्यन खानवर झालेली कारवाई हे सगळंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणी क्लिन चीट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब ही आहे की ही क्लिन चिट आर्यन खानला दिल्ली एनसीबीनेच दिली आहे. यानंतर आता समीर वानखेडे आणि सना मलिक यांच्यासह महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे प्रकरण ज्यांनी बाहेर काढलं त्या समीर वानखेडेंचं म्हणणं काय?
समीर वानखेडे यांच्यासी जेव्हा मुंबई तकने संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत मला सध्या काहीही बोलायचं नाही हे सांगत फोन ठेवला. मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांचं वाक्य पुरं होवू दिलं नाही.
हे वाचलं का?
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकने काय म्हटलंय?
फर्जिवाडा बाहेर आला. सत्य लपून राहात नाही. #NawabMalik #Farziwada #Aryankhan असे हॅशटॅगही त्यांनी या वाक्यासोबत ट्विट केले आहेत.
ADVERTISEMENT
Farziwada exposed!
Truth always prevails!#NawabMalik #Farziwada #AryanKhan https://t.co/ZzZwTty8H2— Ar. Sana Malik-Shaikh (@sanamalikshaikh) May 27, 2022
एनसीबी म्हणजेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने शुक्रवारी एनपीडीस न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खान यांच्या नावाचा समावेश नाही. एनसीबीने सहा आरोपींना आरोपी न करण्याच्या कारणाचाही खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपपत्रात मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना क्लीन चीट मिळालेली नाही. दोघांनाही ड्रग्ज केस प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेलं आहे. एनसीबीला ६ जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
आर्यन खान प्रकरणातील NCB चे दोन तपास अधिकारी निलंबित, कारण गुलदस्त्यात
काय आहे प्रकरण?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं.
मोठी बातमी! आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, के. पी. गोसावी, मिलिंद भानुशाली यांच्याकडून समोर आलेल्या गोष्टी या वेगळंच कथन करत होत्या. प्रभाकर साईलने खंडणीसाठी आर्यन खानला अडकवल्याचा आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर कऱण्यात आला. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT