नागपूर : मेडीट्रीना हॉस्पिटमध्ये होणार लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत बायोटेकने बनवलेल्या लसीची लवकरच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल होणार आहे. देशात चार ठिकाणी ही ट्रायल होणार असून नागपूरमधील मेडीट्रीना हॉस्पिटलचाही यात समावेश आहे. याव्यतिरीक्त दिल्ली आणि पाटणा शहरातील एम्स आणि हैदराबादमधील निलोफर हॉस्पिटलमध्ये या ट्रायल्स घेतल्या जाणार आहेत. ० ते १८ वयोगटातील मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यासाठी परवानगी मेडीट्रीना हॉस्पिटलला मिळाली आहे. […]
ADVERTISEMENT

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत बायोटेकने बनवलेल्या लसीची लवकरच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल होणार आहे. देशात चार ठिकाणी ही ट्रायल होणार असून नागपूरमधील मेडीट्रीना हॉस्पिटलचाही यात समावेश आहे. याव्यतिरीक्त दिल्ली आणि पाटणा शहरातील एम्स आणि हैदराबादमधील निलोफर हॉस्पिटलमध्ये या ट्रायल्स घेतल्या जाणार आहेत.
० ते १८ वयोगटातील मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यासाठी परवानगी मेडीट्रीना हॉस्पिटलला मिळाली आहे. एथिकल कमिटीच्या अंतिम होकारानंतर नागपुरात ही ट्रायल सुरु होईल. लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल घेण्यासाठी ३ टप्पे करण्यात आले आहेत. ज्यात २ ते ६ वयोगटाचा पहिला टप्पा, ६ ते १२ वयोगटाचा दुसरा टप्पा तर १२ ते १८ वयोगटाता तिसरा टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे.
गुळण्या करुन होणार कोरोनाची RTPCR चाचणी, नागपूरच्या NEERI संस्थेकडून नवीन शोध
लहान मुलांवरील लस ही इंट्रामस्कुलर असणार आहे, ज्याचे २ डोस दिले जाणार आहेत. पहिला डोझ झाला की २८ दिवसांनी दुसरा डोस होणार आहे. या क्लिनिकल ट्रायल मध्ये मुलांची रक्ताची तपासणी होणार असून पालकांनी संमती मिळाल्यानंतरच ही ट्रायल घेतली जाणार आहे. लोकांनी या ट्रायलसाठी आपल्या मुलांची नावं नोंदवावीत असं आवाहन मेडीट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांनी केलं आहे.
Door to Door Vaccination चा विचार करा, मुंबई हायकोर्टाचे केंद्रीय समितीला आदेश
नागपूर शहरात लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनीकल ट्रायल बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. यासाठी सुरुवातीला स्टडी सॅम्पल्स घेणार असून ज्या मुलांना चांगले परिणाम दिसून येतील त्यांनाच २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल. देशात ४ ठिकाणी २०८ दिवस ही ट्रायल होणार आहे. त्यामुळे या ट्रायलमधून काय निष्कर्ष पुढे येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.