ज्येष्ठांनंतर मुख्यमंत्री शिंदेचा मोर्चा युवासेनेकडे : अमेय घोलेंच्या गणपती मंडळाला भेट
मुंबई : मनोहर जोशी, गजानन किर्तीकर, लिलाधर डाके अशा शिवसेनेच्या नेत्यांची आणि इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा युवासेनेकडे वळविला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज युवा सेनेचे कोषाध्यक्ष आणि वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिली भेट. यावेळी घोले यांनी मुख्यमंत्र्यांचे पुढे होवून स्वागतही केले. मुख्यमंत्री शिंदे […]
ADVERTISEMENT
मुंबई : मनोहर जोशी, गजानन किर्तीकर, लिलाधर डाके अशा शिवसेनेच्या नेत्यांची आणि इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा युवासेनेकडे वळविला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज युवा सेनेचे कोषाध्यक्ष आणि वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिली भेट. यावेळी घोले यांनी मुख्यमंत्र्यांचे पुढे होवून स्वागतही केले.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिंदे आणिआदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या घोले यांच्या या भेटीनंतर शिवसेनेच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे युवासेना पदाधिकाऱ्यांची भेट घेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री आले त्यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष उपस्थित नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, असे स्पष्टीकरण अमेय घोले यांनी दिले. तसेच स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
RSS मुख्यालयाची सुरक्षा केंद्रीय यंत्रणा करणार : सरसंघचालक भागवत यांनाही Z+ कवच प्रदान
हे वाचलं का?
पक्षफुटी दाखविण्यासाठी कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक :
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे. शिंदे यांच्यासमवेत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर 12 खासदारांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहिर केला. या फुटीमध्ये काही पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींनीही ठाकरेंची साथ सोडली.
ADVERTISEMENT
या सर्व घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. यावर सध्या न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांना प्राथमिक टप्प्यात पक्षात उभी फूट पडल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
इंजिनीअर, पीजी, पीएचडी केलीय; अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का? तानाजी सावंत भडकले
त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, गजानन किर्तीवर आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना पाठिंबा मिळविण्यासाठीच शिंदे यांचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले गेले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT