Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?

मुंबई तक

Mood Of the Nation Survey on Most Popular CM Across India: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अगदी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद (Chief Minister)मिळालं. भाजपकडे (BJP) 105 आमदारांचं बळ असतानाही अवघ्या 40 आमदारांना घेऊन फुटलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं. पण महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री हे किती लोकप्रिय आहेत याबाबत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Mood Of the Nation Survey on Most Popular CM Across India: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अगदी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद (Chief Minister)मिळालं. भाजपकडे (BJP) 105 आमदारांचं बळ असतानाही अवघ्या 40 आमदारांना घेऊन फुटलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं. पण महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री हे किती लोकप्रिय आहेत याबाबत India Today-C Voter ने केलेला सर्व्हेत पाहा जनतेने काय कौल दिला आहे. (cm eknath shinde of maharashtra at what number among the popular chief ministers in across india)

खरं तर भाजपने सहा महिन्यांपूर्वी एक अशी गोष्ट केली की, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. त्यावरुन अनेक चर्चा झाली की, भाजपला एक असाही मोहरा मिळालाय की, तो मराठाही आहे. पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचं कनेक्शन आहे. तो मोहरा महाराष्ट्राच्या राजकारणात तर भाजपने दोनदा प्रयत्न करून सुद्धा त्यांना स्वत:च्या बळावर सरकार बनवता आलं नाही. ती अडचण भाजपची दूर होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं रेटिंग काय हे आपण पाहूया.

मूड ऑफ न नेशन सर्व्हेमध्ये विचारलं गेलं की, देशात टॉप 10 मुख्यमंत्री कोण आहेत. तर त्यात पूर्ण देशात योगी आदित्यनाथ हे 39 टक्के पसंतीसह पहिल्या स्थानी आहेत. तर 2.2 टक्क्यांसह एकनाथ शिंदे हे 8 व्या स्थानी आहे.

महाराष्ट्राने CM म्हणून शिंदेंना स्वीकारलं?, काय आहे Mood Of the Nation