दसरा मेळावा : शिंदे गटाकडून 4 हजार बसेसच बुकिंग, केवळ पार्किंगसाठी 10 मैदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मैदानाचा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाने बीकेसी मैदानावर जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिंदे गटाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय एसटी बसेसचेही ग्रुप बुकिंग करण्यासाठी आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. चार हजारांहून अधिक एसटी गाड्यांचे बुकिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती हाती येत आहे.

ADVERTISEMENT

केवळ पार्किंगसाठी 10 मैदानं बुक

दरम्यान, सभेसाठी येणाऱ्या केवळ गाड्यांच्या पार्किंगसाठी आसपासची दहा मैदानं बुक केलेली आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. बुधवारी सायंकाळी शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शिंदे म्हणाले, आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. मेळाव्यासाठी साधारणतः अडीच ते तीन लाख लोकं येण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आसपासची दहा मैदानं बुक केलेली आहेत. अनेक जण आपल्यासोबत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्याला होतील. जे कार्यकर्ते येतील त्यांची जेवणाची, पाण्याची आणि वॅाशरुमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हे वाचलं का?

दरम्यान या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे या मैदानाची आणि तयारीची पाहणी केली. आमचा दसरा मेळावा या मैदानात मोठ्या उत्साहात होणार आहे. त्यांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात याठिकाणी येणार आहेत. त्यांची गैरसोय होणार नाही. जवळपास 3 लाख शिवसैनिक मेळाव्याला येतील. ते त्यांचा दसरा मेळावा घेत आहेत, त्यांना घेऊद्या असेही भरत गोगावले म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT