Uddhav Thackeray: राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण…; वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई तक

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. घडामोडींना वेग आला असून, पुढे काय होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरूच असून, शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. “राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. घडामोडींना वेग आला असून, पुढे काय होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरूच असून, शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या.

“राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत म्हणाले.

जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी निर्देश दिले.

मास्क सक्तीची वेळ येऊ नये