संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत
संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांकडून नेमकी काय माहिती समोर येते त्याची वाट पाहात आहेत त्यानंतर ते संजय राठोड यांच्याबद्दलचा निर्णय घेतील. संजय राठोड यांचं नाव तक्रारीत कुठेही समोर आलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बहुदा संजय राठोड यांना अभय मिळणार असंच […]
ADVERTISEMENT

संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांकडून नेमकी काय माहिती समोर येते त्याची वाट पाहात आहेत त्यानंतर ते संजय राठोड यांच्याबद्दलचा निर्णय घेतील. संजय राठोड यांचं नाव तक्रारीत कुठेही समोर आलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बहुदा संजय राठोड यांना अभय मिळणार असंच चित्र सध्याच्या परिस्थितीनुसार दिसतं आहे.
काही वेळापूर्वीच पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे पुण्यात पोहचले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला याची ते जातीने माहिती घेणार आहेत.
हे पण वाचा- पूजा चव्हाण प्रकरणातले 7 प्रश्न, उत्तरं अद्यापही मिळाली नाहीत!
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल
वनमंत्री संजय राठोड प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल मागवला आहे. पूजा चव्हाण या 22 वर्षीय टिकटॉक स्टारने मागील रविवारी आत्महत्या केली. त्यानंतर दोनच दिवसात 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा आरोप भाजपने केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हे संपूर्ण प्रकरण घडल्यापासून संजय राठोड ‘नॉट रिचेबल’ आहेत.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने मागच्या रविवारी रात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यात ती वास्तव्य करत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजू लागलं आहे. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर ऑडिओ सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.