महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी राज्यावर ओढवलेली… ओढवणाऱ्या संकटाचा उल्लेख करत त्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार खंबीर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले… “सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी राज्यावर ओढवलेली… ओढवणाऱ्या संकटाचा उल्लेख करत त्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार खंबीर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले…
“सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध रितीनं मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारनं वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली. संकटाचं संधीत रूपांतर केलं, हे आपणा सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसंच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत.
शासन आणि प्रशासनात कुठंही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलं, पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणला. तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असं पाहिलं.