Swapnil Lonkar च्या कुटुंबीयांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सांत्वन

मुंबई तक

MPSC चा विद्यार्थी ज्याने परीक्षा दिल्यानंतर दोन वर्षे नोकरी मिळेल याची वाट पाहिली. मात्र नोकरी न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर हा पुण्याचा तरूण होता. या मायाजालात फसू नका असं लिहून या तरूणाने आपलं आयुष्य संपवलं. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर बरीच टीकाही केली होती. आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकच्या कुटुंबीयांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

MPSC चा विद्यार्थी ज्याने परीक्षा दिल्यानंतर दोन वर्षे नोकरी मिळेल याची वाट पाहिली. मात्र नोकरी न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर हा पुण्याचा तरूण होता. या मायाजालात फसू नका असं लिहून या तरूणाने आपलं आयुष्य संपवलं. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर बरीच टीकाही केली होती. आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.