Uddhav Thackeray नी केलं Nitin Gadkari यांचं कौतुक, म्हणाले तुमच्या जागी जर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात आणि केंद्रात कधीकाळी एकत्र असणारे शिवसेना आणि भाजप सध्या वेगवेगळे झाले असले तरीही अनेक नेत्यांमध्ये आजही मित्रत्वाचे संबंध आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागपूरमधील एका कार्यक्रमात व्हर्च्युअल उपस्थिती लावताना नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमधील आठवणींना उजाळा दिला. नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभावाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. “नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं. तुम्ही ही शहरं जोडली. आता तर अंतर कमी करून तुम्ही ती अजून जवळ आणत आहात”, असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गडकरींचं कौतुक करत उद्धव ठाकरे इथपर्यंतच थांबले नाहीत. स्वप्न पाहायलाही धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता, तर म्हटला असता बघतो मी जरा, कसं शक्य आहे, काय होऊ शकतं, कसं होईल. पण तुम्ही तात्काळ सांगितलं मी करतो आणि करून दाखवलंत. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT