नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास CBI कडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या प्रकरणाता तपास CBI कडे सोपवला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश सरकारवर सध्या चहुबाजूंनी टीका होते आहे. काँग्रेससह सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याची मागणी केली होती. नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबरला बाघंबरी मठाच्या एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. प्रयागराज पोलीस या घटनेचा आतापर्यंत तपास करत होते.

दरम्यान नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणीइतर आखाड्यांमधील संतांकडूनही अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. निरंजनी आखाडाचे प्रमुख महंत रविंद्र पुरी यांनी असं म्हटलं आहे की कथित सुसाईड नोट ही नरेंद्र गिरी यांनी लिहिलेलीच नाही. “महंत नरेंद्र गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असं सांगितलं जातं आहे. मग त्यांची जीभ बाहेर का आली नव्हती? त्यांचे डोळे का बाहेर आले नव्हते? गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या माणसाचं असं होऊ शकतं का? एवढंच नाही तर नरेंद्र गिरी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती असाही दावा रविंद्र पुरी यांनी केला आहे.” ते इंडिया टुडेशी बोलत होते.

हे वाचलं का?

नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटबाबत विचारलं असता, रविंद्र पुरी म्हणाले ‘ही सुसाईड नोट नरेंद्र गिरी यांनी लिहिलेली नाही. ही सुसाईड नोट एखाद्या पदवीधर मुलाने लिहिल्यासारखी वाटते. नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू कसा झाला याची चौकशी आखाडा परिषदही करणार आहे असंही रविंद्र पुरी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर आखाडा परिषदेने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करायची याचा निर्णय सोळा दिवसांनी घेतला जाईल असंही पुरी यांनी सांगितलं आहे.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT