अयोध्येतून योगी, काशीतून पंतप्रधान मोदी; उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा दुहेरी प्रभाव

मुंबई तक

राहुल श्रीवास्तव, इंडिया टुडे पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातही उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते आहे. एखाद्या सरावलेल्या खेळाप्रमाणे आता राजकारणाचा सारीपाट खेळला जातो आहे. पक्ष आणि नेते आता अशा राजकीय हालचाली करत आहेत ज्यामध्ये त्यांची राजकीय कौशल्य दिसून येतील. राजकारणातलं सगळं कसब पणाला लावताना हे नेतेमंडळी दिसत आहेत. ऑगस्ट 1999 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राहुल श्रीवास्तव, इंडिया टुडे

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातही उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते आहे. एखाद्या सरावलेल्या खेळाप्रमाणे आता राजकारणाचा सारीपाट खेळला जातो आहे. पक्ष आणि नेते आता अशा राजकीय हालचाली करत आहेत ज्यामध्ये त्यांची राजकीय कौशल्य दिसून येतील. राजकारणातलं सगळं कसब पणाला लावताना हे नेतेमंडळी दिसत आहेत.

ऑगस्ट 1999 मध्ये उत्तर प्रदेशताल्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह असं म्हणाले होते की ‘ये समय हवा बढाके आंधी बनाने का होता है. जिसले पाँव उखाडे तो उड जाएगा! याचा अर्थ असा की निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरचा काळ हा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला वावटळ किंवा धुरळ्यात बदलण्याचा काळ असतो. अशात जे संतुलन गमावतात त्यांचं अस्तित्व संपतं.

सध्या उत्तर प्रदेशात चर्चा आहे ती म्हणजे हवा भाजपविरोधी आहे ही. या चर्चेला बळ देण्याचं काम केलं ते समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी. गुरूवार संध्याकाळपर्यंत अखिलेश यादव यांनी भाजप सोडणाऱ्या नऊ आमदार आणि तनी मंत्र्यांना प्रवेश देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढली. ही खेळी म्हणजे हवा भाजपच्या विरोधात आहे हे दाखवण्यासाठीच त्यांनी केली हे उघड आहे.