एग्जिट पोल

पेट्रोल-डिझेल सोडा आता CNG च्या भावाने नागपूरकरांच्या खिशाला कात्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने शंभरीचा दर पार केल्यानंतर आता नागपूरकरांना CNG च्या दराने चटके देण्यास सुरुवात केली आहे. नागपूर शहरात CNG चे दर गगनाला भिडले असून प्रति किलोग्रॅम CNG चा दर १२० रुपयांपर्यंत पोहचला आहे. नागपूरमध्ये CNG चे दर हे सध्याच्या घडीला संपूर्ण देशाच्या तुलनेत जास्त आहेत.

नागपूरमध्ये CNG च्या दरांसोबत पेट्रोल आणि डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. नागपूरमध्ये ७ मार्चला डिझेलचा दर ९२ रुपये तर पेट्रोलचा दर १०९ रुपयांपर्यंत पोहचला आहे. पाच मार्चला शहरात CNG चे दर १०० रुपयांवर पोहचले होते. परंतू अवघ्या काही दिवसांत या दरांमध्ये वाढ होऊन हे दर १२० पर्यंत पोहचले आहेत.

नागपूर शहरात गुजरातवरुन LNG मागवला जातो यावर प्रक्रीया केल्यानंतर त्याचं CNG गॅसमध्ये रुपांतर केलं जातं. या कारणामुळे नागपूर शहरात CNG चे दर जास्त असतात. नागपूर शहरात एका खासगी कंपनीकडून तीन CNG पंप चालवले जातात. नागपूर शहरात CNG चं वितरण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. नागपूर शहरात गॅस पाईपलाईनचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर CNG चे दर कमी होऊ शकतात असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT