बारामती : निसर्गाची अद्भुत किमया, सूर्याभोवती निर्माण झालं सप्तरंगी तेजोवलय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती शहरात आज निसर्गाचं एक अनोख रुप पहायला मिळालं. दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान सूर्याभोवती सप्तरंगी तेजोवलय निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली पहायला मिळाली. तब्बल दोन तास बारामतीत निसर्गाचं हे अनोखं रुप पहायला मिळालं.

ADVERTISEMENT

बारामती शहरात आज सकाळपासूनच तापमानात वाढ झालेली अनुभवायला मिळत होती. दुपारी बारा वाजता सूर्याभोवती हे वलय निर्माण झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात याचा फोटो काढला. सूर्याभोवती अशा पद्धतीचं तेजोमय वलय अनेकदा निर्माण झालेलं असून ग्रामीण भागात याला सूर्याला खळे पडणं असं म्हणतात.

ग्रामीण भागात याविषयी लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. यासंदर्भात पुण्याती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ, प्रकाश तुपे यांनी माहिती दिली. “आकाशात उंचावर पाणी असलेले ढग जेव्हा सूर्याच्या आड येतात, त्यावेळी त्या ढगातील पाण्याच्या स्पटीकातून सूर्यकिरणं परावर्तित होतात. त्यामुळे सूर्याभोवती अशा प्रकारचं सप्तरंगी कडं निर्माण होतं.” सूर्याभोवती निर्माण झालेल्या तेजोमय वलयाचा आणि पाऊस पडण्याचा काहीही संबंध नसल्याचं डॉ. तुपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ज्या पद्धतीने इंद्रधनुष्य निर्माण होते त्याच पद्धतीने उंचावर असलेल्या ढगांमध्ये पाणी आणि बर्फ असतात. ढगांच्या वरच्या बाजूला सूर्य आला की सूर्याच्या प्रकाशामुळे ढगातील पाण्याचे रुपांत स्पटीकामध्ये होते आणि अशा पद्धतीने तेजोमय वलय निर्माण होते अशी माहिती डॉ. तुपे यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT