Coma Patient Video : रुग्णालयानं सांगितलं पेशंट कोमात अन् तो चालत बाहेर आला... व्हायरल व्हिडीओचं प्रकरण काय?

मुंबई तक

डॉक्टरांनी कोमात असल्याचं सांगितलेला एक रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर पडला. रुग्णानं डॉक्टरांवर उपचारासाठी 1 लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, त्यानंतर खासगी रुग्णालयावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांनी कोमात असल्याचं सांगितलेला एक रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर

point

रुग्णालयानं उपचारासाठी एका लाख रुपये मागितल्याचा आरोप

point

कुटुंब पैसे आणायला गेलं, परत आल्यावर पाहिलं तर...

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. आरोग्य व्यवस्थेचे आणि खासगी रुग्णालयचे धिंडवडे या व्हिडीओमुळे निघाले आहेत. डॉक्टरांनी कोमात असल्याचं सांगितलेला एक रुग्ण स्वतःहून रुग्णालयातून बाहेर पडला. रुग्णानं डॉक्टरांवर उपचारासाठी 1 लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यानंतर आरोग्य विभागानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा >>Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले? कबर नेमकी आहे तरी कुठे?

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला?

मध्य प्रदेशातील रतलाममध्ये असलेल्या एका खाजगी रुग्णालयाबाहेरचा हा व्हिडाओ असून, या व्हिडीओमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. रतलाममधील मोती नगर परिसरातील रहिवासी बंटी निनामा हा दीनदयाळ नगर पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या भांडणात जखमी झाला होता. त्याला आधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर त्याला जीडी रुग्णालयात रेफर करण्यात आले.


 

व्हिडीओमध्ये काय दिसतंय? 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पेशंट बंटी निनामा अर्धनग्न अवस्थेत कपड्यांमध्ये रुग्णालयाबाहेर उभा असल्याचं  दिसतंय. त्याच्या कंबरेवर कोलोस्टोमी बॅग आणि नाकात एक नळी आणि हातात सलाईनची बॉटल दिसतेय. या रूग्णानं डॉक्टर उपचारासाठी आपल्याकडून 1 लाख रुपये मागित असल्याचा आरोप केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp