Good News : तब्बल १५ दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
नवी दिल्ली : कॉमेडियन राजु श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून जवळपास १५ दिवसांनंतर ते शुद्धीवर आले आहेत. १० ऑगस्ट रोजी जीममधील ट्रेडमिलवर व्यायाम करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीच्या AIMS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवरती असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. अजिज सक्सेना यांनी राजू श्रीवास्तवबाबत दिली […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली : कॉमेडियन राजु श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून जवळपास १५ दिवसांनंतर ते शुद्धीवर आले आहेत. १० ऑगस्ट रोजी जीममधील ट्रेडमिलवर व्यायाम करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीच्या AIMS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवरती असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
ADVERTISEMENT
अजिज सक्सेना यांनी राजू श्रीवास्तवबाबत दिली माहिती
राजू यांचे जनसंपर्क अधिकारी आणि सल्लागार अजिज सक्सेना यांनी राजु यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले, राजु यांना आज सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी शुद्ध आली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहते आनंदी आहेत. सर्वजण त्यांच्या तब्येतीतील सुधारणेसाठी प्रार्थना करत आहेत.
‘देवा राजू श्रीवास्तव यांना बरं कर, आम्ही दारू सोडू,’ कानपूरच्या तरुणांनी घेतली शपथ
हे वाचलं का?
राजु श्रीवास्तव यांच्यावरील उपचारांसाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काल डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार राजु यांच्या मेंदुतील तीन पैकी एक नस अजुनही ब्लॉक आहे, त्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान राजु यांच्यावरील उपचारासाठी डॉक्टरांनी न्युरोफिजियोथेरेपीची मदत घेतली होती. राजु यांच्या मानसिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांनी त्यांना अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवत होते. अमिताभ यांच्या शोज आणि चित्रपटांमधील आवाजाचे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकविण्यात आल्या होत्या.
राजू श्रीवास्तव यांच्याबद्दलच्या अफवांमुळे कुटुंब त्रस्त; फेक न्यूज पाहून पत्नी आणि मुलांना अश्रू अनावर
ADVERTISEMENT
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या खास प्रकारच्या अनोख्या कॉमेडी शोजसाठी ओळखले जातात. राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली तेव्हा चाहते खूपच चिंतित झाले होते. राजू श्रीवास्तव यांचा एक खास प्रेक्षक वर्ग आहे. उत्तम कॉमेडी टायमिंगसाठी राजू ओळखला जातो. राजू श्रीवास्तवने अनेक स्टेज शो केले आहेत. तसंच त्याच्या कॅसेट्स आणि सीडीजही प्रसिद्ध आहेत. अनेक टीव्ही शोजमध्येही राजू श्रीवास्तव झळकले आहेत. सिनेमांमध्येही त्यांनी काम केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT