विनायक राऊतांविरोधात शिवसैनिकांची थेट आदित्य ठाकरेंकडे तक्रार
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी: रिफायनरीवरून शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेना खासादार विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. याबाबत राजापूरमधील नाटे विभागाचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी शिवसेनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना दिलं […]
ADVERTISEMENT
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
रत्नागिरी: रिफायनरीवरून शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेना खासादार विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. याबाबत राजापूरमधील नाटे विभागाचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी शिवसेनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.
९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीची वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून केली जात आहेत, स्थानिक जनता म्हणजे केवळ दोन-चार गावातील विरोधक नाही. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावात विरोधाचा सुर, त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरुप देण्यासाठी शिवसेनेनी सहकार्य करण्याची मागणी पत्राद्वारे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पत्रावर उपविभागप्रमुखापासून, शाखाप्रमुख ते शिवसेनेच्या ग्रामपंतायत सदस्यांच्या सह्या आहेत.
हे वाचलं का?
विनायक राऊतांविरोधात लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
आपण जाणताच आहात की रत्नागिरी जिल्हयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार कमालीच्या वेगाने घटली आहे व ती निरंतर कमी होत आहे. याचे प्रमुख कारण आहे युवक वर्गाचे नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ येथून मुंबई पुण्याच्या दिशेने होणारे स्थलांतर… कोकणातील प्रमुख फळपीक आंबा, हे मोसमी फळपीक असून केवळ हंगामी रोजगार उपलब्ध करून देणारे आहे. विविध नैसर्गिक कारणामुळे येथील मत्स्योत्पादनात ही कमालीची घट दिसून येत आहे. पर्यटन व्यवसाय सुद्धा येथे फार बेताबेतानेच चालला आहे. औद्योगिक विश्वात म्हणण्यासारखे फारसे आशादायक चित्र नाही. परिणामस्वरूप रत्नागिरी जिल्ह्यातील युवक हा कायमच नोकरीधंद्याच्या शोधार्थ मुंबई – पुणे कोल्हापूरच्या दिशेने निघून जात राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून तरुण वर्ग जवळपास दुर्मिळ होतोय
तरुण वर्ग इथून जवळपास दुर्मिळ होत चालला आहे. रिफायनरी सारखा महाकाय प्रकल्प येथे आल्यास येथे लाखो तरुणांना रोजगार व अनेक कुटुंबांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील व रत्नागिरी जिल्ह्यातील नोकऱ्यांचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल. या महाकाय प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबेल प्रकल्पामुळे उद्योग व्यवसायाच्या अनंत संधी निर्माण होतील. वेगवेगळे पूरक उद्योग, वैद्यकीय सुविधा मनोरंजनाची साधने, शैक्षणिक संकुले, क्रीडांगणे याची निर्मिती होईल. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा व विशेषतः रत्नागिरी शहर या प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहे.
ADVERTISEMENT
काही समाजविघातक संस्थांनी प्रकल्पविरोधात धादांत खोटा जहरी अपप्रचार राबवल्याने तुरळक भागात या प्रकल्पाला विरोध देखील आढळतो. मात्र एकूण जिल्ह्यात प्रकल्पाबाबत सकारात्मक वातावरण आहे. या करिता राजापूर तालुक्यातील सुमारे सव्वाशे गावांनी तसेच जवळपास 75 बिगर राजकीय सामाजिक संस्थांनी या प्रकल्पाची मागणी सरकारकडे केली आहे. त्याला अनुसरून शिवसेनेला अत्यंत प्रिय असलेल्या कोकणी जनतेच्या हितासाठी आपण आपल्या मंत्रीपदाच्या काळात रिफायनरी सारख्या प्रकल्पाला राजापूर तालुक्यात जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. या बाबीकडे परिसरातून फारच सकारात्मक रित्या पाहिले जात आहे.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरेंना पत्रातून भावनिक साद
शिवसेनेच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सदर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होईल अशी खात्री वाटू लागली असतानाच नुकताच माननीय खासदार श्री विनायकजी राऊत यांच्या भूमिकेत विसंगतीचा सूर आढळतो. मागील दोन दिवसात त्यांनी ‘ बारसू येथील 90 % स्थानिक ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे असे भाष्य केले आहे व त्यावर जोर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र स्थानिक जनता म्हणजे केवळ दोन – चार गावातील विरोधक नसून आम्ही संपूर्ण रत्नागिरीवासिय आहोत. रत्नागिरी जिल्हयातील सर्व सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग व इतर नागरिक तसेच राजापूर तालुक्यातील इतर गावे व राजापूरची नगरपरिषद यांचा रिफायनरी बाबत असलेला सकारात्मक विचार आपण ध्यानात घ्यावी ही आपल्याला विनंती. ज्या दोन पाच गावांचा प्रकल्पाला विरोध असेल ती गावे प्रकल्पातून वगळण्यात यावीत व प्रकल्पाला राजापूर तालुक्यात मूर्त स्वरूप देण्यासाठी शिवसेनेने सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती आम्ही स्वागिरी वासियांच्या वतीने आपले जवळ करीत आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT