स्मार्टवॉचवर पूर्णपणे विश्वास ठेवणं घातक; डॉक्टरांनी सांगितले धोके

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Smartwatch and Health : आजच्या डिजिटल काळात, दररोज नवीन (Gadget ) गॅजेट्स लाँच केली जात आहेत ज्यामुळे जीवन खूप सोपे होत आहे. भारतात गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉचचा ट्रेंडही (Smartwatch Trend) खूप वाढला आहे. (counterpoint research) काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, जूनच्या तिमाहीत भारताने पहिल्यांदाच चीनला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टवॉच बाजारपेठ बनली आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत जागतिक स्मार्टवॉच बाजारपेठेतील भारताचा वाटा 30 टक्क्यांपर्यंत वाढणार होता, जो उत्तर अमेरिकेच्या 25 टक्के आणि चीनच्या 16 टक्क्यांना मागे टाकत होता.

ADVERTISEMENT

स्मार्टवॉच हे एक डिजिटल घड्याळ आहे जे तुमच्या आरोग्याचा मागोवा घेते आणि तुम्ही त्या डेटाचे विश्लेषण करू शकता. आजच्या काळात, लोक तंदुरुस्तीची उद्दिष्टे गाठण्यासाठी, बर्न झालेल्या कॅलरी पाहण्यासाठी, चालण्याच्या पावलांची मोजणी करण्यासाठी, रक्तदाब तपासण्यासाठी, झोपेची क्रिया मोजण्यासाठी, हृदय गती ओळखण्यासाठी स्मार्ट घड्याळे वापरत आहेत.

बहुतांश स्मार्टवॉचमध्ये आरोग्याशी संबंधित काही ना काही वैशिष्टय़े निश्चितच असतात, ज्यावरून लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात की त्यांच्याकडून मिळालेला डेटा पूर्णपणे अचूक माहिती आहे. असे करणे कधीकधी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. स्मार्टवॉच वापरणे आणि त्याच्या डेटावर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे? आपण वैद्यकीय साधन म्हणून स्मार्टवॉच वापरू शकतो का? आम्ही याबद्दल डॉक्टरांशी बोललो आणि स्मार्टवॉचमधून मिळालेल्या आरोग्य डेटावर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे हे जाणून घेतले.

हे वाचलं का?

शंभर टक्के विश्वास ठेवणं चुकीचं : डॉ. हरेश मेहता

Aajtak.in शी बोलताना डॉ. हरेश मेहता, सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, एसएल रहेजा हॉस्पिटल माहीम-फोर्टिस म्हणाले, “स्मार्टवॉचला एक छोटा संगणक म्हणता येईल ज्यामध्ये अनेक फीचर्स आहेत. आज बरेच लोक स्मार्टवॉच वापरत आहेत आणि प्राथमिक वैद्यकीय उपकरणे म्हणून त्यांचा वापर करत आहेत. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते स्वतःच्या आरोग्याचा अंदाज घेत आहेत.

स्मार्टवॉचद्वारे हृदय गती आणि ईसीजी लय ओळखता येते, परंतु स्मार्टवॉच शंभर टक्के हृदयविकाराचा झटका ओळखेल असा दावा करता येणार नाही. स्मार्टवॉच फक्त तुमची अनियमित हृदयाची लय ओळखू शकते.” डॉ. हरेश पुढे स्पष्ट करतात, “तुमचे स्मार्ट घड्याळ एखाद्या चांगल्या कंपनीचे असल्यास आणि भारतीय नियामक प्राधिकरण सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) द्वारे मान्यताप्राप्त असल्यास, ते ECG च्या 12 लीड्सपैकी एक योग्यरित्या सांगू शकते, परंतु तरीही तुम्ही तुमच्या हृदयावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम होणार नाही.” अटॅक ओळखण्यात सक्षम होणार नाही, असं डॉक्टर म्हणाले. ते वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया म्हणजेच हृदय गती सांगू शकते परंतु त्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.

ADVERTISEMENT

डॉ. हरेश सांगतात, “कोरोनाच्या वेळी, रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठीही अनेकांनी स्मार्टवॉचचा वापर केला. अनेक प्रकरणांमध्ये मी पाहिले आहे की, ब्लड ऑक्सिजन मशीनच्या तुलनेत स्मार्टवॉच चुकीचे परिणाम देतात. फॉल डिटेक्शन सुरक्षिततेसाठी स्मार्टवॉच वापरा. यामध्ये तुम्ही पडल्यास किंवा अपघात झाल्यास तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना अलर्टसह नोटिफिकेशन पाठवले जाईल. परंतु प्रत्येक घड्याळात हे वैशिष्ट्य असले पाहिजे असे नाही. डॉ. हरेश पुढे सांगतात, “जर तुम्हाला स्मार्टवॉच वापरायचे असेल, तर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली करा. तुमच्या स्मार्टवॉचचा डेटा डॉक्टरांना मदत करू शकतो.

ADVERTISEMENT

पाहा Noise चा स्मार्टवॉच

जर तुम्ही डॉक्टरांशिवाय तो डेटा बरोबर मानत राहिलात तर तुमच्यासाठी तणाव निर्माण होईल कारण तुमची प्रकृती बरोबर असेल पण तुमचे स्मार्टवॉच तुमच्या आरोग्याबाबत चुकीचा डेटा देते. मी असेही म्हणेन की जे स्मार्टवॉचचा डेटा पूर्णपणे खरा मानत आहेत, ते त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. स्मार्टवॉच घाला पण त्याला प्राथमिक वैद्यकीय उपकरणाप्रमाणे वागवू नका. तुम्हाला काही अस्वस्थ वाटत असल्यास, ताबडतोब तुमच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांना भेटा. हृदयाची गती अचानक वाढली असेल तर एकाच जागी बसून दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात जा, असं ते म्हणाले.

मान्यताप्राप्त घड्याळ घालणे योग्य : डॉ चंद्रशेखर

डॉ. चंद्रशेखर, सहयोगी संचालक, कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजी-पेसमेकर आणि कार्डिओलॉजिस्ट, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शालिमार बाग, म्हणाले, “स्मार्टवॉचद्वारे हृदय गती ओळखता येते. परंतु अनेक प्रकरणांमध्ये असे देखील दिसून आले आहे की स्मार्टवॉच हृदयाचं रिदम आणि हृदयाची गती यांच्यात फरक करू शकत नाहीत. फिटनेस उद्योगातील लोक कॅलरी बर्न झाल्या हे पाहण्यासाठी स्मार्टवॉच वापरतात जे चुकीचे आहे. स्मार्टवॉच तुम्हाला अंदाजे कॅलरी बर्न केलेलं सांगतात. उदाहरणार्थ, तुम्ही बसूनही तुमचा हात हलवल्यास, काही स्मार्ट घड्याळे ते चालण्याच्या पावलांमध्ये मोजतील. स्मार्टवॉचचा डेटा पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध न करणाऱ्या अनेक त्रुटी आहेत. ज्या स्मार्टवॉचला हेल्थ मॉनिटरिंगची मान्यता मिळाली आहे, त्या घड्याळांवर काही प्रमाणात विश्वास ठेवता येईल, असं डॉक्टर चंद्रशेखर सांगतात.

आयुष्मान भारत ‘डिजिटल हेल्थ आयडी’ कसं बनवायचं? समजून घ्या सोप्या पद्धतीने…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT