Don’t Talk to me असं संसदेत सोनिया गांधी स्मृती इराणींना काय म्हणाल्या? नेमकं काय घडलं?

मुंबई तक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या स्मृती इराणींना Don’t Talk to Me असं म्हणाल्या आहेत. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर संसदेत चांगलाच गदारोळ झाला. या दरम्यान सोनिया गांधींच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातही वाद झाला. ज्यावेळी सोनिया गांधी या स्मृती इराणींना उद्देशून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या स्मृती इराणींना Don’t Talk to Me असं म्हणाल्या आहेत. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर संसदेत चांगलाच गदारोळ झाला. या दरम्यान सोनिया गांधींच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातही वाद झाला. ज्यावेळी सोनिया गांधी या स्मृती इराणींना उद्देशून डोन्ट टॉक टू मी असं म्हणाल्या.

नेमकं काय घडलं? सोनिया गांधी स्मृती इराणींना काय म्हटल्या?

काँग्रेस खासदार अधीरंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक टीपण्णी केली. त्यानंतर संसदेत गदारोळ पाहण्यास मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सोनिया गांधींनाही माफी मागण्यास सांगितलं. त्यावेळी या दोघींमध्ये वादही झाला. ज्यानंतर स्मृती इराणी यांना सोनिया गांधी डोन्ट टॉक टू मी अर्थात माझ्याशी बोलूही नका असं उद्देशून म्हणाल्या.

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती नाही तर त्या राष्ट्रपत्नी आहेत असं अधीरंजन चौधरी यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपने अधीररंजन चौधरी यांच्यावर आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली. माझ्याकडून चूक झाली मी बोलून बसलो तसं मला बोलायचं नव्हतं असं अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं. मात्र भाजपने या प्रकरणी गदारोळ केला.

स्मृती इराणी अधीररंजन चौधरी यांना उद्देशून काय म्हणाल्या?

काँग्रेसची भूमिका आदिवासी, गरीब आणि महिलांच्या विरोधातली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या महिलेवर अशा प्रकारे टीपण्णी करणं काँग्रेसला शोभतं का? महिलांचा अनादर करणं आणि त्याद्वारे भारताच्या राज्यघटनेला ठेच लागली आहे असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp