काँग्रेससाठी हा ऐतिहासिक क्षण! भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी यांचं भावनिक पत्र
काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून सुरू झाली आहे. राहुला गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. १२ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही यात्रा असणार आहे. ३ हजार ५७० किमीचं अंतर या यात्रेत कापलं जाणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वाची मानली जाते आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या […]
ADVERTISEMENT

काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून सुरू झाली आहे. राहुला गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. १२ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही यात्रा असणार आहे. ३ हजार ५७० किमीचं अंतर या यात्रेत कापलं जाणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वाची मानली जाते आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या यात्रेविषयी एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या सगळ्यांनाच त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आपण या यात्रेत सहभागी होऊ शकलो नाही म्हणून खेदही व्यक्त केला आहे.
काय म्हटलं आहे सोनिया गांधी यांनी?
कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काँग्रेसने सुरू केली आहे. या दरम्यान मी उपचारांसाठी आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी देशाबाहेर आहे. मी या यात्रेत सहभागी होऊ शकले नाही याबाबत दिलगीर आहे. आपल्या पक्षाची एक महान परंपरा आहे. काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस आणि भारत जोडो यात्रा सुरू होणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला विश्वास आहे की या यात्रेमुळे आपल्या संघटनेत अमूलाग्र बदल होईल. भारताच्या राजकारणातही परिवर्तन घडून येईल हा विश्वासही मला वाटतो आहे.
मी खासकरून आपल्या पक्षातल्या १२० सहकाऱ्यांना शुभेच्छा देते. कारण हे सगळेच जण सुमारे ३६०० किमीची ही यात्रा पूर्ण करणार आहे. ही यात्रा अनेक राज्यांमधून जाणार आहे. ज्यामध्ये हजारो लोक सहभागी होतील. या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देते. वैचारिकदृष्ट्या मी तुमच्या सोबतच आहे. ही यात्रा कशी पुढे जाते आहे हे मी लाईव्ह पाहणार आहे. या आपण आता संकल्प करूया आणि आपल्या कर्तव्यांसाठी एकत्र येऊया.