“जीभ घसरली होती माफ करा” अधीर रंजन चौधरी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकसभेतले काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांची माफी मागितली आहे. मी जे बोललो ती माझी चूक झाली, माझी जीभ घसरली होती असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत गुरूवारी केलं होतं. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. आता आज अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे.

ADVERTISEMENT

अधीर रंजन चौधरी यांनी पत्र लिहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली

लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्र लिहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. मी तुमच्या पदाबाबत चुकून अपशब्द बोलून गेलो. मला त्याविषयी खेद वाटतो. मी तुम्हाला हे विश्वासाने सांगू इच्छितो की माझ्याकडून जीभ घसरल्याने मी हे बोलून गेलो. मी यासाठी दिलगीर आहे. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केली होती टिपण्णी

अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी राष्ट्रपती याऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख करत द्रौपदी मुर्मू यांच्यावर टिपण्णी केली होती. त्यामुळे गुरूवारी भाजप खासदार यावरून प्रचंड आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्या वाद झाला. तुम्ही माझ्याशी बोलायची गरज नाही असंही सोनिया गांधी स्मृती इराणी यांना उद्देशून म्हणाल्या. अधीर रंजन चौधरी यांनी गुरूवारीही सभागृहात दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र भाजप खासदारांनी गदारोळ केला त्यानंतर कामकाज दुपारी ४ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

भाजप खासदार गदारोळ घालू लागले होते तेव्हा त्यांनी सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. हे नेमकं काय चाललं आहे हे विचारण्यासाठी सोनिया गांधी जेव्हा जागेवर आल्या तेव्हा त्यांच्यात स्मृती इराणी यांच्यात वाद झाला. काँग्रेसने देशातल्या आदिवासी समाजाचा आणि महिलांचा अपमान केला आहे असा आरोप काँग्रेसवर भाजपने गुरूवारी केला.

या सगळ्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी गुरूवारीही माफी मागितली. तसंच आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांची माफी मागितली आहे. माझी जीभ घसरली त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून घडली. मला हिंदी भाषेची चांगली जाण नाही त्यातून हे घडलं आहे. मला माफ करावं अशीही विनंती अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT