सायकलवरुन विधानसभेत पोहचले काँग्रेस आमदार, पण का..?
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट सायकलवरुन मोर्चा काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला आहे. काँग्रेसने अशा अनोख्या पद्धतीने केलेलं आंदोलन हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेकदा असं पाहायला मिळतं की, अधिवेशनाच्या दिवशी विरोधी पक्षाचे आमदार हे आंदोलन करत असतात. पण आज सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट सायकलवरुन मोर्चा काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला आहे. काँग्रेसने अशा अनोख्या पद्धतीने केलेलं आंदोलन हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेकदा असं पाहायला मिळतं की, अधिवेशनाच्या दिवशी विरोधी पक्षाचे आमदार हे आंदोलन करत असतात. पण आज सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
पाहा काँग्रेस आमदारांचं सायकल आंदोलन
पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने काँग्रेसच्या आमदारांनी सायकलवरुन रॅली काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नाना पटोले असं म्हणाले की, ‘केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल चालवत विधानभवनात जाऊन मोदी सरकार चा निषेध केला.’
हे वाचलं का?
ही बातमी नक्की पाहा: 8 वर्षापूर्वी सीतारमण पेट्रोल दरवाढीवर काय म्हणाल्या होत्या?
तर दुसरीकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्रातील सरकार सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आमची जबाबदारी आहे. जे केंद्र सरकारचे लोक पूर्वी थोडे फार पेट्रोलचे दर वाढले की निषेध करायचे, राजकारण करायचे, आज तेच दरवाढीचे समर्थन करत आहेत.’ असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सतत होत आहे वाढ
ADVERTISEMENT
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे. याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र देखील लिहलं होतं. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पोहचल्याचं असल्याचं समोर आलं होतं. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात 14 वेळा वाढ झाली आहे. तर जानेवारीमध्ये 10 वेळा दरवाढ झाली होती. यादरम्यान पेट्रोल 2.59 रुपयांनी महागलं होतं तर डिझेल 2.61 रुपयांनी महागलं होतं. 2021 या वर्षाचा विचार केल्यास आतापर्यंत पेट्रोल हे 6.77 रुपये आणि डिझेल 7.10 रुपये प्रति लीटरने महाग झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT