काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? खरगे की थरूर?
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जवळपास चोवीस वर्षांनी पार पडते आहे. अशात मल्लिकार्जुन खरगे यांची उमेदवार म्हणून शेवटच्या दिवशी एंट्री झाली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. शशी थरूर विरूद्ध मल्लिकार्जुन खरगे असा सामना निवडणुकीत पार पडणार आहे. काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. शशी […]
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जवळपास चोवीस वर्षांनी पार पडते आहे. अशात मल्लिकार्जुन खरगे यांची उमेदवार म्हणून शेवटच्या दिवशी एंट्री झाली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. शशी थरूर विरूद्ध मल्लिकार्जुन खरगे असा सामना निवडणुकीत पार पडणार आहे. काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. तर मल्लिकार्जुन खरगे हे शेवटच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.
ADVERTISEMENT
मल्लिकार्जुन खरगे गांधी परिवाराचे निकवर्तीय
मल्लिकार्जुन खरगे हे गांधी परिवाराचे निकटवर्तीय आहेत. तर शशी थरू हे G23 चा भाग आहेत. G23 च्या नेत्यांनी कायमच राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत जो पराभव झाला त्यानंतर लगेचच काँग्रेसने अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. अशात कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे नेतेही होते. या दोन दिग्गजांनीही काँग्रेसला राम राम केला आहे.
शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोघंही विद्यार्थी दशेपासून राजकारणात आहेत. राजकीय अनुभव विचारात घेतला तर तो मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जास्त आहे. मल्लिकार्जुन खरगेंकडे जवळपास ४५ वर्षांचा राजकीय क्षेत्रातला आणि काँग्रेसमधला अनुभव आहे. तर शशी थरूर यांच्याकडे तीन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांसोबतही काम केलं आहे.
हे वाचलं का?
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्याबाबत..
मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म २१ जून १९४२ ला झाला. गुलबर्गातल्या नूतन विद्यालयातून शिक्षण घेतलं. तसंच तिथल्या सरकारी कॉलेजमधून कायदे विषयात डिग्री घेतली. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी मजुरांच्या हक्कासाठी काही खटले लढले होते.
शशी थरूर यांचा जन्म ९ मार्च १९५६ ला लंडनमध्ये झाला. थरूर दोन वर्षांचे होते तेव्हा त्यांचं कुटुंब भारतात आलं. त्यानंतर मुंबई कोलकाता या ठिकाणी शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतल. त्यानंतर तीन दशकं ते संयुक्त राष्ट्रांशी जोडले गेले होते.
ADVERTISEMENT
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर कुणाकडे किती राजकीय अनुभव?
मल्लिकार्जुन खरगे यांनी मजूर आंदोलनापासून त्यांची कारकीर्द सुरू केली. १९६९ मध्ये ते काँग्रेसशी जोडले गेले. त्याच वर्षी ते गुलबर्गा येथून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षही झाले. १९७२ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. ते आत्तापर्यंत ८ वेळा आमदार तर २ वेळा खासदार झाले आहेत. सध्या ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत.
ADVERTISEMENT
शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रांसोबत काम केल्यानंतर २००९ मध्ये ते राजकारणात आले. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा तिरूवनंतपुरमहून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती ते जिंकले. याच जागेवरून ते तीनदा खासदार झाले आहेत.
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांची कौटुंबिक माहिती
मल्लिकार्जुन खरगे १३ मे १९६८ ला राधाबाईंसोबत लग्न केलं. या दोघांना तीन मुली आणि दोन मुलं आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियंक खरगे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत.
शशी थरूर यांनी १९८१ तिलोत्तमा मुखर्जी यांच्याशी लग्न केलं होतं. २००७ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी कॅनेडियन डिप्लोमॅट क्रिस्टा गिल्ससोबत लग्न केलं. मात्र हे लग्नही फार टिकलं नाही. ऑगस्ट २०१० मध्ये शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केलं. २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला.
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्याकडे किती संपत्ती?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यानुसार त्यांच्याकडे १५.७७ कोटींची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर एकही क्रिमिनल केसनाही.
शशी थरूर यांनी जे प्रतिज्ञापत्र २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलं होतं त्यानुसार त्यांच्याकडे ३५ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. तर त्यांच्यावर दोन गुन्हेगारी प्रकरणंही दाखल आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT