मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा, अटक वॉरंट रद्द
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये १४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे अध्यक्ष निकाल इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. यामुळे, शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. २००८ साली भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केलं होतं. […]
ADVERTISEMENT
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळामध्ये १४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे अध्यक्ष निकाल इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. यामुळे, शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
२००८ साली भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केलं होतं. याबद्दल कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर मनसेकडून ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती.
सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणे आणि आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिरीष पारकर, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या वर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांतता भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे वाचलं का?
राज ठाकरे म्हणाले, ‘मनसैनिकांच्या काळजीपोटी अयोध्या दौरा रद्द केला; शिव्याही खायल्या तयार..’
शिराळा न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अटक वॉरंट बजावले होते. मात्र, ठाकरे यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी राज ठाकरे हे समक्ष हजर राहू शकत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावे, असा अर्ज दिला होता.
ADVERTISEMENT
हा अर्ज शिराळा न्यायालयाने फेटाळला होता. शिराळा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज राज ठाकरे यांच्यावतीने इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर हा निकाल देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बीडच्या कोर्टानेही जारी केला वॉरंट
सांगली आधी बीडच्या परळी जिल्हा कोर्टानेही राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू केला होता. राज ठाकरेंनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यासंदर्भातल्या प्रकरणात हे वॉरंट लागू केला गेला होता. या प्रकरणी परळी कोर्टाने मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं होतं.
राज यांच्या विरोधात आजवर अनेक केसेस आहेत. त्यासंदर्भात राज ठाकरेही भाष्य करतात. राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भाषण केल्यानंतर त्याचे पडसाद पुढचे आठ- दहा दिवस उमटले असल्याचं आपण पाहिलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT