IPS Rashmi Shukla यांना बढती; फोन टॅपिंगमुळे अडकल्या होत्या वादात
Controversial Rashmi Shukla Promoted : दिल्ली : फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने (Appointments Committee of Cabinet) एकूण २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यात महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासह आयपीएस अधिकारी सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णी यांचा समावेश […]
ADVERTISEMENT

Controversial Rashmi Shukla Promoted :
दिल्ली : फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने (Appointments Committee of Cabinet) एकूण २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यात महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासह आयपीएस अधिकारी सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णी यांचा समावेश आहे. (IPS Rashmi Shukla is accused of tapping phones and leaking reports on scams in transfers of police officers. Now he has been promoted.)
सदानंद दाते हे सध्या मुंबई पोलील दलात कार्यरत होते. त्यांनी नुकताच महाराष्ट्र एटीएस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस आयुक्त होते. तर त्यापूर्वी त्यांनी केंद्रात ३ वर्षं प्रतिनियुक्तीवर काम केलं आहे. यात न्याय-विधि विभागात संयुक्त सचिवपद, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
Shinde-BJP मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला ठिणगी? श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ पुन्हा टार्गेटवर!









