Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद टोकाला, झी स्टुडीओवर हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Har Har Mahadev Movie controversy: मुंबई: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनीसोबत करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज (17 डिसेंबर) स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मधील झी वाहिनीच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी मुंबई पोलिसांनी या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत सरकारला खडा सवाल विचारला आहे. (controversy over har har mahadev movie swarajya sangathan workers protested outside zee studio channel)

ADVERTISEMENT

यावर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाविरूध्द आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले सरकारने शिवप्रेमींचा आवाज दाबण्यापेक्षा शिवद्रोह्यांना अद्दल घडवा, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली आहे.

“तज्ज्ञ इतिहासकारांचं मत घेऊन..” हर हर महादेव सिनेमाच्या वादानंतर झी स्टुडिओचं स्पष्टीकरण

हे वाचलं का?

आपल्या पोस्टमध्ये पुढे छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, ‘या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा व विकृत इतिहास दाखवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भामटे मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर बंधने घालण्याचे व कारवाई करण्याचे धाडस कोणतेच सरकार दाखवत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संविधानिक मार्गाने लढणाऱ्या शिवभक्तांना मात्र इतकी हीन व क्रूर वागणूक दिली जाते, हा कोणता न्याय आहे? हे कसले प्रशासन आहे?’ असा सवालही संभाजीराजेंनी यावेळी विचारला आहे.

‘हर हर महादेव’ विरोधाची धार तीव्र; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाही आक्षेप

ADVERTISEMENT

या संपूर्ण प्रकरणात सरकार केवळ अंगकाढू भूमिका घेत असल्याचे सांगत शिवभक्तांची भावना व विषयाची दाहकता लक्षात घेत सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे व हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास बंदी घालावी. अन्यथा याचा जितका त्रास झी स्टुडिओला सोसावा लागेल, तितकाच सरकारलाही सोसावा लागेल, असा इशारा; छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे शेकडो कार्यकर्ते हे सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT