याकूब मेमनच्या कबरीवरून वाद; कबर आणि मजारमध्ये काय आहे फरक?
मुंबईमध्ये 1993 साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटचा आरोपी याकूब मेमन ज्याला 2016 साली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याचं मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलं होतं. त्याच्या अंत्यविधीला मोठ्यासंख्येत लोक उपस्थिती राहिले होते. त्यामुळे त्यावेळी एका दहशतवाद्याचं उदात्तीकरण केलं जातंय असे आरोप झाले. आता पुन्हा याकूब मेमन हे नाव चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे याकूबच्या कबरीची […]
ADVERTISEMENT
मुंबईमध्ये 1993 साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटचा आरोपी याकूब मेमन ज्याला 2016 साली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याचं मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलं होतं. त्याच्या अंत्यविधीला मोठ्यासंख्येत लोक उपस्थिती राहिले होते. त्यामुळे त्यावेळी एका दहशतवाद्याचं उदात्तीकरण केलं जातंय असे आरोप झाले. आता पुन्हा याकूब मेमन हे नाव चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे याकूबच्या कबरीची सजावट करून त्याची मजार केली जातेय, असा आरोप आता जोर धरू लागला आहे.
ADVERTISEMENT
कबरची मजार केल्याचा दावा
2016 साली फाशी दिल्यानंतर हजारोच्या उपस्थितीमध्ये याकूब मेमनचं दफनविधी करण्यात आलं होतं. त्याला मुंबईच्या मारिन लाईन्ससमोरील बडा कब्रस्थान येथे दफन करण्यात आलं होतं. नुकतंच त्याच्या कबरीजवळील दृश्य समोर आले आहेत. त्याच्या कबरच्या बाजूला असलेल्या कठड्याला मार्बल लावण्यात आलं आहे. तसेच त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कबरीचं मजारमध्ये रूपांतरित करण्यात येत असल्याचा दावा आता केला जातोय.
हे वाचलं का?
याकूबच्या कबरीवरून पेटला राजकीय वाद
यावरून आता हा वाद पेटताना दिसत आहे. बॉम्बस्फोटमध्ये अनेकांचे जीव गेले होते आणि त्याच बॉम्बस्फोटच्या सूत्रधाराचं म्हणजेच दहशतवाद्याचं मेल्यानंतर उदात्तीकरण केलं जातंय, असं आरोप होताना दिसत आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूबच्या कबरीचं सजावट केलं गेलंय, असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना फडणवीस सरकारने का दिलं, असा सवाल विरोधी पक्षाकडून करण्यात येतंय. अफझल गुरु, अजमल कसाब, ओसामा बिन लादेन यांच्या मृतदेहाप्रमाणे याकूबच्या मृतदेहाचं देखील तशाचपद्धतीने विल्हेवाट का लावली गेली नाही? असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं कबर आणि मजार याच्यात फरक काय?
ADVERTISEMENT
प्रत्येक गावात वक्फ बोर्डच्या माध्यमाने कब्रस्तानसाठी जागा दिली जाते. किंवा काही ठिकाणी खासगी जागा देखील असतात. तेथे मुस्लिम समाजातील मृत व्यक्तींना दफन केलं जातं. प्रत्येक व्यक्तीचे दफन केलेल्या स्थानाला कंबर असं संबोधलं जातं. तर मुस्लिम समाजातील समाज प्रबोधन करणाऱ्या संतांना पीर-वली असं म्हणलं जातं. त्यांच्या दफनस्थळाला मजार असं संबोधलं जातं. त्याठिकाणी दर्गा देखील स्थापन केली जाते, जिथे त्यांना मानणारे लोक जात असतात. त्या मजारची योग्य ती निगा राखली जाते. मजारवर सतत कपड्यांची आणि फुलांची चादर पांघरलेली असते. त्याठिकाणी नेहमी दिवाबत्ती केली जाते. तर सामान्य व्यक्तीच्या कबरीवर त्यांचे नातेवाईक कोणी शुक्रवारच्या नमाजच्यानंतर तर अनेकजण शबे बारात या महत्वाच्या रात्री फुल चढवायला जात असतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT