7 राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील वाढत्या कोविड-19 रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याची घंटा वाजवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या राज्यांमध्ये साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. भूषण म्हणाले, “पात्र लोकसंख्येसाठी लसीकरणाची गती वाढवली पाहिजे. तसेच five-fold धोरण आणि कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे.”

ADVERTISEMENT

सावधगिरीचा इशाना देताना काय म्हणाले आरोग्य मंत्रालय?

सावधगिरीचा इशारा देताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की आगामी महिन्यांमध्ये विविध उत्सवांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संसर्गजन्य विषाणूंचा प्रसार होऊ शकतो आणि कोरोना रुग्णांमध्ये आणि मृत्यूमध्ये वाढ होऊ शकते.

देशातील सध्याची कोरोना आकडेवारी काय सांगते?

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 19,046 नवीन कोविड-१९ रुग्ण तर 49 मृत्यूची नोंद झाली आहे. संक्रमीत झालेल्या रुग्णांमध्ये 0.31 टक्के रुग्ण सक्रिय आहेत, तर रिकव्हरी रेट 98.50 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांत अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 571 ने कमी झालेली आहे.

हे वाचलं का?

दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 4.96 टक्के नोंदविला गेला आहे तर साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट 4.63 टक्के असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,34,65,552 पर्यंत वाढली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.

मागच्या 24 तासातील मृतांची संख्या

मृतांमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी पाच, छत्तीसगडमधील तीन, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि त्रिपुरामधील प्रत्येकी दोन आणि ओडिशा, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँडमधील प्रत्येकी एकाची नोंद झाली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मागच्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संक्रमित होत होते तसेच मृत्यू पावत होते. महाराष्ट्रात गणेशोत्सव, दहिहंडी असे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी ही परिस्थिती प्रशासन कशा पद्धतीने हाताळते हे पाहावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT