चिंता वाढली! कोरोना मृत्यूचं थैमान; 24 तासांत 1,700 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं दिसत असतानाच वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 1,000 पेक्षा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 24 तासांत (2 फेब्रुवारी) 1,700 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरताना दिसू लागला आहे. दिवसागणिक दररोज […]
ADVERTISEMENT

एकीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं दिसत असतानाच वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 1,000 पेक्षा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 24 तासांत (2 फेब्रुवारी) 1,700 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरताना दिसू लागला आहे. दिवसागणिक दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत आहे. ही बाब दिलासादायक असली, तरी दुसरीकडे वाढत्या कोरोना मृत्यूंमुळे चिंता वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना मृतांचा आलेख दररोज वर जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,733 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोना मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे.
शनिवारी (29 फेब्रवारी) समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात 871 मृत्यू झाले होते. त्यानंतर रविवारी (30 जानेवारी) 893, सोमवारी (31 जानेवारी), मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, गेल्या 24 तासांत झालेल्या मृतांच्या आकड्यांनी टेन्शन वाढवलं आहे. 1,733 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 4 लाख 97, 975 वर म्हणजे पाच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.