Wuhan Lab मध्येच Corona व्हायरस तयार केला, वटवाघूळ तर एक बहाणा आहे: संशोधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: कोरोना विषाणूची (CoronaVirus) उत्पती कशी झाली? या प्रश्नाचं उत्तर अवघं जग शोधत आहे. आता एका नव्या संशोधनात असं म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस हा चीनमधील (China) त्याच वुहान लॅबमध्ये (Wuhan lab) बनविण्यात आला ज्याबाबत संपूर्ण जगाला संशय आहे. या नव्या अभ्यासानुसार, कोरोना व्हायरस जेव्हा तयार झाला तेव्हा रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या जोरावर असं दाखविण्याचा प्रयत्न केला गेला की, हा व्हायरस एखाद्या वटवाघळामुळे पसरला आहे.

ADVERTISEMENT

डेली मेल यूकेच्या वृत्तानुसार, ब्रिटिश प्रोफेसर अँगुस आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. बर्जर यांना संशोधनात असे आढळून आले आहे की, चीनने कोरोना आपल्याकडे तयार झाला आहे हे लपविण्यासाठी रेट्रो इंजिनिअरिंगचे कागदपत्र तयार केले आणि संपूर्ण जगाला धोका दिला.

या संशोधन निबंधात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या वर्षी कोरोना विषाणूविरूद्ध लस बनवताना शास्त्रज्ञांना काही फिंगरप्रिंट्स आढळून आले जे व्हायरसमध्ये देखील होते. ज्यामुळे असं संकेत मिळत आहेत की, व्हायरस हा एखाद्या लॅबमधून आला आहे. त्यावेळी वैज्ञानिकांना हा मुद्दा उजेडात देखील आणायचा होता. परंतु बऱ्याच मोठ्या संस्थांनी ही गोष्ट नाकारली आणि वटवाघळाची थेअरीच योग्य असल्याचं म्हटलं होतं.

हे वाचलं का?

Corona संकट जगावर येण्याआधीच वुहान लॅबचे तीन कर्मचारी झाले होते आजारी

…अमेरिकेलाही चीनवरच दाट संशय

ADVERTISEMENT

आता, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीरपणे कोरोनाच्या उत्पत्तीची चौकशीबद्दल बोलले आहेत. तेव्हा जगातील अनेक देश आता या गोष्टीकडे वळत आहेत. व्हाइट हाऊसला दिलेल्या एका गुप्त रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान लॅबच्या काही कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यांच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं दिसली होती आणि त्यानंतरच कोरोनाने जगात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

इतकेच नव्हे तर अमेरिकेतील आरोग्य अधिकारीदेखील या वेळी निशाण्यावर आले आहेत. कारण वुहानमधील संशोधनासाठी काही गुंतवणूक त्यांच्या वतीनेही केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु याच दरम्यान, नुकत्याच झालेल्या संशोधनात असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, कोरोना विषाणूचा जन्म प्रयोगशाळेत झाला होता. हा नैसर्गिकरित्या उत्पत्ती झालेला व्हायरस नाही.

Corona जागतिक स्तरावर पसरला पण Wuhan lab leak बाबतचे प्रश्न अनुत्तरीतच!

वुहान लॅबमध्ये नेमकं घडतं तरी काय-काय?

हे संशोधन संपूर्ण 22 पानांचं आहे. ज्यामध्ये वुहान लॅबची संपूर्ण कुंडली आहे. दाव्यानुसार, वुहान लॅबमध्ये 2002 ते 2019 दरम्यान काय-काय घडलं त्याची संपूर्ण माहिती या अहवालात देण्यात आली आहे. ज्यामुळे कोरोना व्हायरसबद्दल मोठा खुलासा होऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये कोरोना व्हायरस हा जगासमोर आला. तेव्हापासून आतापर्यंत जगात या व्हायरसने सर्वांनाच हैराण केलं आहे. यामुळे आतापर्यंत जगात लाखो लोक मरण पावले आहेत. तर अद्यापही कोट्यवधी लोकं अजूनही या व्हायरसला बळी पडत आहेत. जगातील अनेक राष्ट्रांनी वुहान लॅबच्या मागे चीनचा हात असल्याचे बर्‍याचदा सांगितले आहे. परंतु चीन प्रत्येकवेळी ती गोष्ट नाकारत आहे. डब्ल्यूएचओनेही कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भात चौकशी सुरू केली होती, परंतु चीनमध्ये गेलेल्या टीमला तिथे कोणतेही सहकार्य मिळू शकले नाही. म्हणूनच सतत याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT