Chinchwad: चिंचवड पोटनिवडणुकीत काटे करणार जगतापांवर मात?
चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (kasba Peth) पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप (ashwini jagtap) मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे (Nana Kate) निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळाली […]
ADVERTISEMENT
चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (kasba Peth) पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप (ashwini jagtap) मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे (Nana Kate) निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळाली होती.
ADVERTISEMENT
चिंचवडमध्ये 50 टक्केच मतदान :
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 87 हजार 145 मतदरांनीच मतदानाचा अधिकार बजावाला.
चिंचवडमध्ये 3 लाख 2 हजार 974 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 57 हजार 820 मतदारांनी मतदान केलं. 2 लाख 65 हजार 974 महिला मतदार आहेत, त्यापैकी 1 लाख 29 हजार 321 महिला मतदारांनीच मतदानाचा अधिकार बजावला.
हे वाचलं का?
52.1 टक्के पुरुष मतदारांनी, तर 48.62 महिला मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झालं आहे.
Chinchwad Bypolls: जिथे फडणवीसांची सभा, तिथूनच गेली पवार, जयंत पाटलांची रॅली
ADVERTISEMENT
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :
मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.
ADVERTISEMENT
भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी. कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असून कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी थेरगाव येथील कामगारभवना शेजारील मोकळ्या जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
Chinchwad Bypoll: ठाकरेंचा शब्दही कलाटेंनी मोडला, शेवटच्या क्षणी केली मोठी घोषणा
राहुल कलाटेंच्या बंडखोरीने गाजली निवडणूक :
चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढविणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी देईल असा तर्क लढविण्यात येत होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी नाना काटेंना (Nana Kate) उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: राहुल कलाटेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करुनही राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम राहिले. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT