कोव्हिडचा ST ला फटका! दोन वर्षात सात हजार कोटींचा संचित तोटा
सध्या राज्यभरात गाजतो आहे तो एसटीचा संप. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा संप मिटवण्यासाठी सरकारने आज पगारवाढीचा तोडगा काढला. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांची भूमिका गुरूवारी स्पष्ट करणार आहेत. मात्र कोव्हिडच्या काळात एसटीला मोठा फटका बसला आहे. एसटीला गेल्या दोन वर्षांमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. आपण जाणून घेऊ […]
ADVERTISEMENT

सध्या राज्यभरात गाजतो आहे तो एसटीचा संप. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा संप मिटवण्यासाठी सरकारने आज पगारवाढीचा तोडगा काढला. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांची भूमिका गुरूवारी स्पष्ट करणार आहेत. मात्र कोव्हिडच्या काळात एसटीला मोठा फटका बसला आहे. एसटीला गेल्या दोन वर्षांमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं आहे मागच्या दोन वर्षात?
मागच्या दोन वर्षात एसटीला कोव्हिडचा फटका!
महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी एसटीचा संचित तोटा 5 हजार कोटी रूपयांचा होता. गेल्या दोन वर्षात त्या थोडी-थोडकी नाही सात हजार कोटींची भर पडली आहे. त्यामुळे सध्या एसटीचा संचित तोटा 12 हजार कोटी रूपये इतका झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी वर्षभर पूर्णपणे बंद होती. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत गेला.