Mumbai lockdown : मुंबईही लॉकडाऊनच्या वाटेवर?; केंद्राचे नियम सांगत महापौरांनी दिले संकेत

मुंबई तक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांच्या कालावधीतच मुंबईत रुग्णसंख्येचे उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन आणि कोरोना उपाययोजनांबद्दल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांच्या कालावधीतच मुंबईत रुग्णसंख्येचे उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन आणि कोरोना उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेनंही दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही मोठी गर्दी आणि कार्यक्रम टाळावेत”, असं आवाहन महापौरांनी केलं.

Corona : काळजीत भर! मुंबईत 8082 नव्या रूग्णांची नोंद, दिवसभरात दोन मृत्यू

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेनं सोसायट्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबद्दलही माहापौरांनी यावेळी माहिती दिली. “ज्या विंगमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळतील ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती”, असं त्या म्हणाल्या.

यावेळी महापौरांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचंही आवाहन केलं. “ओमिक्रॉनला घाबरू नका. परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आता सगळे सावरतायेत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले, तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाहीय गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करून घ्या. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. विना मास्क फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

Omicron symptom: ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, नका करू दुर्लक्ष

मुंबईतील लॉकडाऊनच्या प्रश्नाबद्दल बोलताना महापौर पेडणेकर यांनी सांगितलं की, “20 हजारांचा आकडा पार झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल, असं म्हणत त्यांनी लॉकडाऊनबद्दल इशारा दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp