Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nanded Suspicion of an immoral relationship and Youth Murder: नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध (immoral relationship) असल्याच्या कारणावरुन एका तरुणाचा भोसकून खून (Murder) करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. मात्र पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तरुण इमारतीच्या गच्चीवरून पडल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणी नांदेडमधील भाग्यनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करून खून करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (two youths brutally murdered a 23 year old youth on suspicion of having an immoral relationship with his mother)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

नांदेड शहरातील राधेश्याम अग्रवाल (वय 23 वर्ष) नावाचा तरुण हा स्नेहनगर येथील पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याला एका व्यक्तीने दत्तक घेतले होते. पण दत्तक घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर राधेश्याम हा त्याच्या घरातच भाड्याने राहू लागलेला. 7 फेब्रुवारीच्या रात्री राधेश्याम अग्रवाल हा त्याच्या इमारतीच्या छतावर झोपला होता. यावेळी आकाश पालिमकर आणि आदिनाथ पालिमकर या दोघांनी मिळून राधेश्यामवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं आणि त्यानंतर त्याला छतावरून खाली ढकलून दिलं.

यावेळी राधेश्यामचा मृत्यू हा अपघाती झाला असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. यानंतर पोलिसांनी राधेश्यामचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय तपासणीदरम्यान राधेश्यामवर चाकूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आदिनाथ आणि आकाश पालिमकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

Crime: पतीच्या मित्रासोबत 10 वर्ष गुपचूप अनैतिक संबंध, पत्नीचं भयंकर कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींपैकी एका आरोपीला असा गैरसमज झाला होता की, राधेश्याम याचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध आहेत. याच संशयातूने आरोपीने राधेश्याम यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आपला गुन्हा लपविण्यासाठी हा घातपात असल्याचा कटही त्यांनी रचला. मात्र, पोलिसांनी केलेल्या अचूक तपासामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

ADVERTISEMENT

Crime : पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध अन् हत्या, ‘असा’ झाला भांडाफोड!

ADVERTISEMENT

याप्रकरणी सर्व आरोपींवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांनी दिली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT