दूधात भेसळ करणाऱ्या दोघांना अटक, मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई
मुंबईच्या अंधेरी भागातील वर्सोवा परिसरात क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. दुधाची भेसळ करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळ असलेलं २९४ लिटर दूध पोलिसांनी जप्त केलंय. अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे नामांकित कंपन्यांचं दूध खरेदी करुन त्यामध्ये तेवढ्याच मात्रेत पाणी भरायचे. यानंतर लाईटर, मेणबत्ती आणि स्टोव्हच्या सहाय्याने हे आरोपी दूधाची पिशवी अशा […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या अंधेरी भागातील वर्सोवा परिसरात क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. दुधाची भेसळ करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळ असलेलं २९४ लिटर दूध पोलिसांनी जप्त केलंय.
ADVERTISEMENT
अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे नामांकित कंपन्यांचं दूध खरेदी करुन त्यामध्ये तेवढ्याच मात्रेत पाणी भरायचे. यानंतर लाईटर, मेणबत्ती आणि स्टोव्हच्या सहाय्याने हे आरोपी दूधाची पिशवी अशा पद्धतीने बंद करायचे की समोरच्या व्यक्तीला जराही संशय येणार नाही. गोकुळ, अमूल अशा नामांकित दूध कंपन्यांच्या दूधात भेसळ करण्याचं काम हे आरोपी करत होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT